माणूस होण्याची स्पर्धा जिंकायला हवी!

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : वणी : शुक्रवार : दि 13 डिसेंबर 2024
β⇒नाशिक, ( प्रतिनिधी : रवींद्र मालुंजकर ) :–आजच्या गतिमान आणि स्वार्थी जगात प्रत्येकाला काहीतरी अधिकचं आणि झटपट मिळवण्याची स्पर्धा सुरू आहे. परंतु ‘माणूस’ होण्याची स्पर्धा जिंकायला हवी. तरच आपण सुखी आणि समृद्ध आयुष्य जगू शकतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी आणि सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर यांनी व्यक्त केले. निमित्त होते खुटवडनगर येथील सिटू भवनातील डॉ.सुधीर फडके सार्वजनिक वाचनालयाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचारमंचावर कवी रवींद्र मालुंजकर यांनी सादर केलेल्या ‘कवितांच्या गावात’ या मैफिलीचे. अध्यक्षस्थानी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि वाचनालयाचे संस्थापक संचालक डॉ.डी.एल.कराड होते. वाचनालयाचे उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, सचिव ॲड.तानाजी जायभावे उपस्थित होते. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफिलीत कवी रवींद्र मालुंजकर यांनी त्यांच्या सुरेल आवाजात लोकप्रिय अशी बालगीते, भक्तिगीते, भावगीते, विडंबन कविता, वात्रटिका, हास्यकविता, गझल, पोवाडा, लोकगीते तसेच त्यांच्या ‘आठवांचे लक्ष मोती’ या काव्यसंग्रहातील-लेक निर्मळ परीस, आयुष्याचे होते सोने
लेक जाता सासुरास, घरदार सुने-सुने… या ‘लेक’ कवितेतील आशयसंपन्न ओळींसह अंतर्मुख करणाऱ्या निवडक कवितांचे सादरीकरण केले. याशिवाय वामनदादा कर्डक, बाबुराव बागुल, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, नारायण सुर्वे, कुसुमाग्रज, राम पाठक, प्रा. राजेश्वर शेळके, राजेंद्र सोमवंशी यांच्या उत्तमोत्तम कवितांची पेरणी करत मैफिल एका उंचीवर पोहोचवली. अध्यक्षीय भाषणात डॉ.डी.एल.कराड यांनी उपस्थित श्रोतुवर्गाला ग्रंथालयातील उत्तमोत्तम ग्रंथांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी नाशिक ते घुमान (पंजाब) असा २२०० किलोमीटर सायकल प्रवास करणारे संजय बडे यांच्या विशेष सन्मानासह वाचनालयाचे नियमित वाचक लक्ष्मण इंगळे, गोविंद देशमुख, प्रभाकर जाधव, अशोक विभुते, अजितकुमार बोकील, शोभा पवार, मंगला कुमावत, चिमणराव देवरे, प्रिया पवार, अरविंद कुलकर्णी, चारुशीला जाधव, मोहित थोरात, ज्योती लोणारे, कांचन जावळे, दिलीप शिंत्रे, प्रशांत पंडित, शुभांगी बच्छाव यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ॲड.वसुधा कराड, गौतम कोंगळे, निवृत्ती केदार, तुकाराम सोनजे, कॉम्रेड पाटील, कॉम्रेड जाधव, रखमाजी सुपारे, विजय पगारे आदी मान्यवरांसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी ग्रंथपूजन करण्यात आले. वाचनालयाचे युवासंचालक नितीन सांगळे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी प्रास्ताविक तर कवी विवेक उगलमुगले यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथसेविका सुचिता खडके यांनी आभार मानले.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा