बिटको महाविद्यालयात रासेयो वतीने ‘ करिअरच्या वाटा ‘ या विषयावरील व्याख्यान संपन्न !
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. ४ सप्टेंबर २०२३
β⇒ नाशिकरोड ,ता. ४ ( प्रतिनिधी – संजय परमसागर ) :-गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व युवक कल्याण विभाग , महाराष्ट्र शासन व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती , नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये अनंत निकम यांचे ‘ करिअरच्या वाटा ‘ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . याप्रसंगी अनंत निकम यांनी शासकीय सेवेतील विविध सेवा व संधी विषयी विस्तृत माहिती दिली . महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिकच्या श्रीमती मोहिनी सोर यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमास एकूण १४५ रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सक्रिय सहभाग घेतला .
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार , सहा. कार्यक्रम अधिकारी डॉ. सुधाकर बोरसे , महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. कांचन सनानसे यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो ८२०८१८०५१०
