११ ऑगस्टला एक शाम काका के नाम ‘ गाण्यांची सदाबहार मैफिल…
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक रोड प्रतिनिधी : संजय परमसागर
β⇒ नाशिक रोड, ता . ८ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- अमरकुमार प्रस्तुत आशा मेलोडी मेकर्स वतीने शुक्रवार दि. ११ ऑगस्ट रोजी ‘ आशा मेलोडी मेकर्स ‘ वतीने स्वर्णिमा सभागृहात ‘ एक शाम काका के नाम ‘ या सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या सदाबहार अजरामर फिल्मी गाण्यांची मैफल इंदिरानगर येथील बापु बंगल्यासमोर स्वर्णिमा हॉल मध्ये सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे . यात स्वतः गायक अमरकुमार सर , गॉडविन लुईस , संजय परमसागर , सुनिल गांगुर्डे , नेहा आहेर , ताहिर शेख हे गाणी सादर करणार आहेत . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक कांबळे करणार असून ध्वनीव्यवस्था पवन वंजारी करणार आहेत . रसिकांसाठी कार्यक्रम विनामूल्य असून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले , मो . 8208180510