सुरगाणा तालुक्यात भेगू सावरपाडा येथे आगीत हाेरपळून युवक ठार,हृदय पिळवटणारी घटना , १४ लाखांचे नुकसान, तालुक्यात शोकाकुल वातावरण, नुकसान भरपाईची मागणी
सुरगाणा : (भेगू सावरपाडा येथे आगीत दोन गॅस टाकींचा स्फोट होऊन मुलगा विजय पाडवी (२८) याचा हाेरपळून मृत्यू)
β⇔“दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल” वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि. 22 ऑक्टोबर 2023
β⇔बोरगाव , ता. 21 : ( प्रतिनिधी : लक्ष्मन बागुल ) :- सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथे शनिवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास साडेपाचला दत्तू पाडवी यांच्या घराला आग लागली. या आगीत दोन गॅस टाकींचा स्फोट होऊन त्यांचा मुलगा विजय दत्तू पाडवी (२८) याचा हाेरपळून मृत्यू झाला. या हृदय पिळवटणाऱ्या दुर्घटनेत अंदाजे १४ लाख, २७ हजारांचे नुकसान झाले आहे. सदर आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. भेगू सावरपाडा येथे पहाटे साडेपाचच्या सुमारास ही आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग आटोक्यात येईपर्यंत सकाळी साडेआठपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.
आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी हंडे, पिंप, हाती येईल त्या भांड्यात पाणी भरून डोक्यावर पाणी वाहून आणत आग विझवण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केले. यावेळी घरातील दोन्ही गॅस टाकीचा स्फोट झाल्याने विजय पाडवी हा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. आगीत घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम ७० हजार रुपये, संसाराेपयाेगी वस्तू असा एकूण अंदाजे १४ लाख, २७ हजार रुपयांचे नुकसान झाले. यावेळी घटनास्थळी धाव घेऊन तलाठी पालवी यांनी सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. विजय पाडवी यांचे जागेवरच शवविच्छेदन करून शोकाकूल वातावरणात दुपारी दोन वाजता अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. प्रशासनाने त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी तालुक्यातून मागणी होत आहे .
β⇔“दिव्य भारत बीएसएम न्यूज” : मुख्य संपादक : डॉ.भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)