





बोरगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कीट वाटप
दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज – प्रतिनिधी – बोरगाव : लक्ष्मन बागुल
बोरगाव, ता. २१ ( दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज वृत्तसेवा ) :- सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त 700 तृणधान्ये मिनी कीटचे वाटप कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कळवण तालुका कृषी अधिकारी मीनल म्हस्के, कळवण मंडळ कृषी अधिकारी सिताराम पाखरे, सरपंच अशोक गवळी होते.
यावेळी अशोक डमाळे यांनी मिनी कीट व पंतप्रधान पीकविमा योजने बद्दल उपस्थित नागरिकांना माहिती दिली. 31 जुलैपर्यंत पीकविमा सीएससी सेंटरवर जावून स्वयंघोषणा पत्र भरून पीकविमा उतरवण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बोरगाव येथील सीएससी सेंटरला भेट देण्यात आली. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य वामण गवळी, हिरामण हाडस, हिराबाई गांगुर्डे, कृषी सहायक राजेंद्र साबळे, जगन्नाथ गावित, नामदेव भोये, ग्रामसेवक सुकदेव बागुल, पुंडलिक भोये, बोरगाव परिसरातील महिला बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.
दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज :मुख्य संपादक : डॉ .भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०
