





“भारत सरकार ग्रंथ महोत्सव” हा विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारा अनोखा उपक्रम- प्राचार्य डॉ. अशोक भोसले

β⇔“दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.18 डिसेंबर 2023
β⇔पुणे, ता. 15 (प्रतिनिधी :विपुल धसाडे ) :- “भारत सरकार ग्रंथ महोत्सव” या राष्ट्रीय उपक्रमामध्ये राज्यातून आपल्या शहरातून लाखो विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. विद्यार्थी जीवनामध्ये विविध पुस्तकांची व ग्रंथांशी मैत्री करून आपल्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होणे अत्यावश्यक आहे. यातूनच वाचन संस्कृतीचा विकास वृद्धिंगत होऊन उद्याचा सृजनशील नागरिक घडवण्यास नक्की मदत होईल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोसले यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ खराडी येथील शंकरराव उरसळ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर महाविद्यालयामध्ये “शांतता, पुणेकर वाचत आहेत” या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमाम बोलतांना केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालय सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा तृषा शंग्रपवार म्हणाले की ‘ विद्यार्थ्यांना पुस्तकांप्रती प्रेम निर्माण होऊन वाचनासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील उपप्राचार्या डॉ विजया बर्गे, पदविका विभाग प्रमुख डॉ सुजित काकडे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन आपल्या आवडीचे पुस्तक वाचन केले. कार्यक्रमाचे आभार व नियोजन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सौ सविता सोनवणे, प्रा तृप्ती शहा, प्रा केतकी लखाने, प्रा पल्लवी खरबस यांनी केले.
β⇔“दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०