आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रसाहित्यिक
β : नाशिक(शहर) :⇔नामवंत गायिका रागिणी कामतीकर यांच्या गायनातून सर डॉ.मो.स.गोसावी पावन स्मृतींना समर्पित सुरेल मैफल-(प्रतिनिधी:छाया लोखंडे)
β : नाशिक(शहर) :⇔नामवंत गायिका रागिणी कामतीकर यांच्या गायनातून सर डॉ.मो.स.गोसावी पावन स्मृतींना समर्पित सुरेल मैफल-(प्रतिनिधी:छाया लोखंडे)
0
1
2
3
6
8
नामवंत गायिका रागिणी कामतीकर ह्यांच्या गायनातून सर डॉ. मो. स. गोसावी पावन स्मृतींना समर्पित सुरेल मैफल
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 14 सप्टेंबर 2024
β⇔नाशिक(शहर),दि.14(प्रतिनिधी:छाया लोखंडे):-गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के.बी.के.ए.के.महिला महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे ‘सर डॉ. मो. स. गोसावी संगीत महोत्सव’ आयोजित केला आहे. संस्थेच्या सचिव प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे रविवार दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी संस्थेच्या ‘गुरुदक्षिणा’ सभागृहात संध्याकाळी ५ :३० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. नाशिककरांसाठी सुप्रसिद्ध गायिका रागिणी कामतीकर ह्यांच्या गायनाची सुरेल मैफल आयोजित केली आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात संस्थेचे भूतपूर्व सचिव व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ सर डॉ. मो.स. गोसावी ह्यांच्या जन्मतिथीचे औचित्य साधून महाविद्यालयाचा संगीत विभाग संगीत महोत्सवाचे आयोजन करत आला आहे. ह्या महोत्सवात आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. पं. अजय पोहनकर, पं.जयतीर्थ मेहुंडी, प्रख्यात गायिका देवकी पंडित, डॉ.श्रुती सडोलीकर, ज्येष्ठ गायिका आशाताई खाडिलकर तर युवा पीढीची गायिका आर्या आंबेकर, बासरी वादक अमर ओक ह्यांनी आपली कला नाशिककरांसमोर सादर केली आहे. दरवर्षी नाशिककर ह्या संगीत महोत्सवाची वाट पहात असतात.
यंदा वर्षी आदरणीय स्व. गोसावी सरांच्या व महाविद्यालयाच्या संस्थापक प्राचार्या स्व. डॉ. सुनंदाताई गोसावी ह्यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित केलेली स्वरांजली तसेच लता मंगेशकर यांच्या ९५ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित ‘मेरी आवाज ही मेरी पहचान है ;! हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील सरांचे योगदान तर सर्व विदीत आहेच.परंतु सरांना संगीत कलेत ही विशेष रुची होती. ह्या वर्षी ही संगीत महोत्सवाची ही परंपरा संगीत क्षेत्रात स्वतः ची विशेष ओळख असलेल्या गायिका सौ. रागिणी कामतीकर ह्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे चालू रहाणार आहे. त्यांना तबल्यावर साथ देणार आहेत प्रसिद्ध तबला वादक आदित्य कुलकर्णी तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मालपुरे ह्या करणार आहेत.
नाशिककरांनी ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे , अध्यक्ष डॉ.आर पी. देशपांडे, चेअरमन डॉ. सुहासीनी संत, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर, उपप्राचार्य डॉ. नितीन सोनगीरकर , संगीत विभाग प्रमुख व कला शाखेचे समन्वयक पं. अविराज तायडे ह्यांनी केले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
0
1
2
3
6
8