





त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “हिंदी उपन्यासम्राट मुंशी प्रेमचंद” यांची 144 वी जयंती उत्साहात साजरी

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार :: दि. 31 जून 2024
β⇔,त्र्यंबकेश्वर (नाशिक), दि.31 ( प्रतिनिधी : प्रा. समाधान गांगुर्डे ):- त्र्यंबकेश्वर येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे,कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे हिंदी विभागांतर्गत आज “हिंदी उपन्यासम्राट मुंशी प्रेमचंद” यांची 144 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले. प्रसंगी महाविद्यालयाचे सकाळ सत्र प्रमुख डॉ. राजेश झनकर, स्टाफ सेक्रेटरी प्रा. उत्तम सांगळे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. अजित नगरकर व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. नीता पुणतांबेकर यांनी ‘मुंशी प्रेमचंद’ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही व इतर प्राध्यापकांनी देखील प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार हिंदी विभाग प्रमुख प्रा.समाधान गांगुर्डे यांनी केले. याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख प्रा. समाधान गांगुर्डे यांनी प्रास्ताविक करून मुंशी प्रेमचंद यांच्या वैयक्तिक व साहित्यिक योगदानाबद्दल माहिती दिली तसेच हिंदी साहित्यामध्ये प्रेमचंद यांचे नाव सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिल्या गेल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी प्रो.संदीप निकम, डॉ.भागवत महाले, डॉ.विठ्ठल सोनवणे, डॉ.दिनेश उकीर्डे, प्रा. मनोहर जोपळे, प्रा.आशुतोष खाडे, प्रा.प्रणिल जगदाळे, डॉ.सुलक्षणा कोळी, प्रा.गणेश पारखे, डॉ.वैशाली जाधव , प्रा.निलेश म्हरसाळे, प्रा.ऋषिकेश गोतारणे, डॉ. जया शिंदे , प्रा.अर्चना धारराव, प्रा. शाश्वती निरभवणे, प्रा.विष्णु दिघे, डॉ. मनीषा पाटील व इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)
©सदर लेखाबाबत संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. सदर मत सर्वस्वी लेखकाचे असून त्यांचीच जबाबदारी आहे,