





सराडला कौशल्य विकास कार्यक्रमात शिवणकाम प्रशिक्षण संपन्न
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : बोरगाव- प्रतिनिधी – लक्ष्मन बागुल
β⇒ बोरगाव , ता.२७ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा) : – सराड (ता. सुरगाणा) येथे जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती सुरगाणा अंतर्गत सराड ग्रामपंचायत व ग्रामिण महिला विकास संस्था बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 15 वा वित्त आयोग व पेसा अबांध निधी कौशल्य विकास घटक अंतर्गत स्थानिक पातळीवर महिला बचत गट सदस्यांना रोजगार उपलब्ध होण्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना 1 महिना कालावधीचे शिवणकाम प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण हे महिलांना पूर्णपणे 100 टक्के अनुदान द्वारे आयोजित करून ग्रामपंचायत व आयोजक संस्थेमार्फत आवश्यक ते साहित्य व साधन पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप सराड येथील ग्रामपंचायतचे सरपंच नामदेव भोये, पेसा समिती सदस्य हरिभाऊ भोये, शास्त्री गावित, उपसरपंच गायकवाड, संगिता भोये, शकुंतला भोये, पंडित भोये, वसंत गवळी, जिल्हा समन्वयक श्रावण देवरे, अध्यक्ष वामण गवळी, कोषाध्यक्ष चंद्रकला गावित, प्रशिक्षक लीलाबाई कुवर (गायकवाड) उपस्थित होते.
या प्रसंगी सरपंच व मान्यवरांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना उपजीविका सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी श्रावण देवरे यांनी शासनाच्या विविध योजना बाबतीत मार्गदर्शन करून पुढील काळात सहकार्य केले जाईल असे सूचित केले. वामण गवळी यांनी आभार व्यक्त केले तर
सूत्रसंचालन कैलास भोये यांनी केले.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज: मुख्य संपादक : डॉ भागवत महले, मो .८२०८१८०५१०
