





महाराष्ट्रात कागदी कपांमुळे कॅन्सरचा धोका: अन्न व औषध प्रशासनाच्या दुर्लक्षाची येडशी ग्रामस्थांकडून तक्रार

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि.23 जानेवारी 2025
- β⇔येडशी,(धाराशिव)ता.23(प्रतिनिधी: सुभान शेख ):- राज्यात कॅन्सरसारख्या घातक आजारांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणजे चहा आणि इतर गरम पेयांसाठी वापरण्यात येणारे कागदी कप, ग्रामस्थांकडून अशी तक्रार करण्यात आली आहे की, कागदी कप तयार करण्यासाठी बीपीए (बिस्फेनॉल ए) आणि मायक्रोप्लास्टिकसारख्या हानिकारक रसायनांचा वापर केला जात आहे, ज्यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत आहे.
कागदी कपांचा उपयोग गरम पेयांसाठी केल्यावर, त्यातील प्लास्टिक कण वितळून पाण्यात मिसळतात. हे कण शरीरात गेल्यामुळे कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. किराणा दुकाने, हॉटेल्स आणि विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशा कपांचा वापर होत असल्याचे ग्रामस्थांच्या माध्यमातून समोर आले आहे.अन्न व औषध प्रशासनाकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्वरित उपाययोजना करत कागदी कपांवर बंदी घालून संबंधित उत्पादनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांची मागणी: कागदी कपांमुळे होणाऱ्या आरोग्य धोक्याची अन्न व औषध प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. कॅन्सरसारख्या आजारांपासून संरक्षणासाठी पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पर्यायांचा अवलंब केला जावा. हानिकारक रसायनांचा वापर करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. आरोग्याशी संबंधित गंभीर बाबींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे नागरिकांचे जीवन वाचवण्यास मदत होईल, अशी ग्रामस्थांची मागणी केली आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )