आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
β : त्र्यंबकेश्वर :⇔त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे “क्रीडा स्पर्धेत” घवघवीत यश-(प्रतिनिधी : प्रा. विक्रम पोटे)
β : त्र्यंबकेश्वर :⇔त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे "क्रीडा स्पर्धेत" घवघवीत यश-(प्रतिनिधी : प्रा. विक्रम पोटे)
0
1
2
3
6
5
त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे “क्रीडा स्पर्धेत” घवघवीत यश
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 31 ऑगस्ट 2024
β⇔त्र्यंबकेश्वर, 31 (प्रतिनिधी : प्रा. विक्रम पोटे ):- महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा हायस्कूल नाशिक येथे संपन्न झालेल्या विविध स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी योगासन, कुस्ती व बुद्धिबळ या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत 19 वर्षे खालील मुलींच्या स्पर्धेत कु. रेखा भोये हिने तृतीय क्रमांक पटकावला असून तिची निवड विभागीय क्रीडा स्पर्धेत झाली आहे. बलकवडे व्यायामशाळा येथे 19 वर्षा खालील 55 किलो ग्रीको रोमन झालेल्या मुलांच्या कुस्ती स्पर्धेत कु. कुणाल काळे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याची विभागीय क्रीडा स्पर्धेत निवड झालीआहे. त्र्यंबकेश्वर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. श्रुती मिंदे, कु. स्नेहल चव्हाण, कु. ईश्वर दराने, कु. ओमकार वाघेरे यांनी बुद्धिबळ स्पर्धेत यश संपादन आहे. त्यांची निवड जिल्हास्तरावर झाली आहे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार, प्रा. विक्रम पोटे, डॉ. दिनेश उकीर्डे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती श्री. बाळासाहेब श्रीरसागर, उपाध्यक्ष श्री. विश्वास मोरे, उपसभापती श्री. देवराम मोगल, चिटणीस श्री. दिलीप दळवी, तालुका संचालक श्री. रमेश पिंगळे, मुरलीधर पाटील, ॲड. कैलास पाटील, विभाग प्रमुख प्रा.अनिल खेडकर, प्रा.विद्या जाधव, प्रा. मीना काळे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
0
1
2
3
6
5