सुरगाणा जिल्हा परिषद शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातर्फे विद्यार्थी मतदार जनजागृती रॅली संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 8 एप्रिल 2024
β⇔ सुरगाणा( शहर ), दि.8 (प्रतिनिधी :रतन चौधरी):-आगामी लोकसभा निवडणुक २०२४ पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी, म्हणून मतदान जनजागृती करीता विद्यार्थ्यांची रॅलीचे आयोजन करण्यात आली होती. जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नं.१,२ पोस्ट बेसिक आश्रम शाळा सुरगाणा,नुतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय सुरगाणा या शाळेतील विद्यार्थी,शिक्षक सहभागी झाले होते.
दरम्यान जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नं.१,२ येथून रॅलीचे आयोजन करत भदर रस्ता,मेनरोड, बाजार गल्ली,होळी चौक, पोलीस ठाणे,पंचायत समिती, तेल्ली गल्ली,गांधीनगर या मार्गे रॅली काढण्यात आली. यावेळी “हातात मतदार राजा जागा हो”! , लोकशाहीचा धागा हो”! चला मतदान करुया, देशाची प्रगती करुया”! ‘एक -दोन- तीन- चार मतदारांचा जयजयकार !’अशा घोषवाक्याचे फलक घेऊन घोषणा देत रॅली काढली. यारॅलीमध्ये गटशिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे, प्राचार्य प्रभाकर चव्हाण, विस्तार अधिकारी नरेंद्र कचवे, मुख्याध्यापक सोमनाथ भोये,सुरेश जाधव, शिक्षक रतन चौधरी,सुधाकर भोये,पांडुरंग वाघमारे,चंदर चौधरी, कमल पवार, भारती राऊत,भारती ठाकरे,सुनंदा गायकवाड,नाथ देशमुख, यशवंत देशमुख आदी उपस्थित होते.
β : सुरगाणा( शहर ):⇔ सुरगाणा जिल्हा परिषद शाळा,कनिष्ठ महाविद्यालयातर्फे विद्यार्थी मतदार जनजागृती रॅली संपन्न-(प्रतिनिधी : रतन चौधरी)β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510