





‘स्पेलिंग बी’ सारख्या उपक्रमातून आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयी गोडी निर्माण होणार’ : सुरगाणा गटशिक्षणाधिकारी–अल्पा देशमुख

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि. 28 जून 2024
β⇔सुरगाणा(नाशिक), दि.28 (प्रतिनिधी : रतन चौधरी ):- ‘स्पेलिंग बी’ सारख्या उपक्रमातून इंग्रजी विषयी आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दूर होऊन गोडी निर्माण झाल्यास निश्चितपणे इंग्रजी विषयावर भविष्यात प्रभुत्व मिळवतील असे प्रतिपादन तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांनी प्रबोधन विद्यालय अंबाठा येथे ‘स्पेलिंग बी ‘स्पर्धे प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी महेश पोतदार, उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, शालेय पोषण आहार अधीक्षक पी.यु.पाटील, विस्तार अधिकारी बाबुराव महाले, भाऊसाहेब सरक, नरेंद्र कचवे, प्रमिला शेंडगे, दिलीप नाईकवाडे, डॉ.नेहा शिरोरे आदी उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाल्या,”सुरगाणा सारख्या अतिदुर्गम भागात इंग्रजी भाषेबाबत पालक अनभिज्ञ असतात. अशा उपक्रमातून तालुक्यात ‘स्पेलिंग बी’ सारख्या स्पर्धेमुळे इंग्रजीबद्दल एक सकारात्मक वातावरण तयार झाले असून विद्यार्थ्यांना इंग्रजीची अतिरिक्त गोडी निर्माण झाली आहे. सुरगाण्यात ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली आहे. तालुक्यातील २३ केंद्रातील ४३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी निर्माण व्हावी व इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून त्यांनी जगाच्या स्पर्धेत टिकावे. या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळेस ‘स्पेलिंग बी ‘स्पर्धा संपन्न झाली .
सदर स्पर्धेची ‘एशिया अँड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद होणार असल्याने विद्यार्थी शिक्षक व पालकांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.नीलिमा, प्रा.इंद्रसेन यांनी काम पाहिले. एकूण ५० शब्दांचे उच्चारण करून विद्यार्थ्यांनी त्याचे अचूक श्रुतलेखन करणे , असे या स्पर्धेचे स्वरूप होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व केंद्रप्रमुख, बी आर सी टीम , इंग्रजी विषय तालुका समन्वयक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कैलास बागुल यांनी केले.
फोटो- सुरगाणा तालुक्यातील प्रबोधन विद्यालय अंबाठा येथे ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत सहभागी विद्यार्थी, शिक्षक, पालक, अधिकारी वर्ग.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)