





विश्वकप विजेत्या टीम इंडियाला 11 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि. 6 जून 2024
β⇔नाशिक, दि.6 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- नासिक – टी ट्वेंटी विश्वचषक 2024 हा कप भारतीय संघाने जिंकल्यानंतर भारतीय संघावर बक्षीसांचा अक्षरशः पाऊस पडत असून दक्षिण आफ्रिके विरुद्ध अंतिम सामन्यात सात धावांनी भारताने शानदार विजय मिळविला. तब्बल 17 वर्षांनी भारताने t20 वर्ल्ड कपचे जेतेपद पटकावले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत चार जुलै रोजी भारतीय संघाचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.
भारतीय संघाच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येने मुंबईकर मरीन ड्राईव्ह येथे काल उपस्थित होते. त्यांची विजय परेड पार पडल्यानंतर आज भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा महाराष्ट्राच्या विधान भवनात सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघासाठी मोठी घोषणा करत महाराष्ट्र सरकारकडून भारतीय संघाला तब्बल 11 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवर पोस्ट करत दिली. तसेच मुंबई महानगर क्षेत्रात भविष्यात भव्य आणि आधुनिक असे स्टेडियम सुद्धा उभारण्यास गती देण्यात येईल असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी भारत हा क्रिकेटमध्ये विश्वगुरू आहे हे आपण टी ट्वेंटी विश्वचषक विजेत्या संघाने सिद्ध केले आहे. असे म्हनत त्यांनी भारतीय संघाचे कौतुक केले. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी आणि त्यांच्या संघाने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून यावे अशी कामगिरी केली आहे ,असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)