





“ओबीसीतून आरक्षण मागण्याचा हट्ट सोडल्यास मनोज जरांगे पाटलांचे स्वागत, अन्यथा काळे झेंडे दाखवणार”– गजू घोडके यांचा इशारा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 9 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक, दि.9 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- मराठा आरक्षणाबाबत लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप 13 ऑगस्टला नाशिक मध्ये होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर ओबीसीतून आरक्षण मागण्याचा जरांगे पाटील यांनी हट्ट सोडल्यास त्यांचे आम्ही स्वागत करू,मात्र ते आपल्या हट्टावर कायम राहिल्यास त्यांना 13 ऑगस्ट रोजी नाशकात काळे झेंडे दाखवले जातील, असा इशारा ओबीसी सुवर्णकार समितीचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे, की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी सुरुवातीला मराठा आंदोलकाची मागणी होती, मात्र ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण मिळावे असा हट्ट जरांगे पाटील यांनी धरल्याने आरक्षणाच्या मुद्द्याला नाहक खतपाणी मिळाले आहे. ओबीसी समाजाला महा कष्टाने आरक्षण मिळाले आहे, त्यासाठी कित्येक वर्षे संघर्ष करावा लागला, परंतु ओबीसीच्या ताटातलेच आरक्षण आम्हाला हवे आणि त्यासाठी दमबाजी, मी पाया पाडेल, त्याला पाडेल, अशा वंदना करून व समंग प्रसिद्धी मिळणे कितपत योग्य आहे ?प्रत्येकाचा एकेरी उल्लेख करणे खालच्या पातळीवर ऊतरुण बोलणे पितृतुल्य व्यक्तींचा आधार न बाळगणे हे जरांगे पाटला सारख्या मराठा नेत्याला निश्चितच अशोभनीय आहे .महाराष्ट्र शासनाने मराठा समाजास आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतरही सातत्याने आंदोलनाची नौटंकी करणे, सरकारला धमक्या देणे कितपत उचित आहे, याचे आत्मपरीक्षण म्हणून जरांगे पाटलांनी करावे. केवळ विशाल मोर्चे काढून आणि दमबाजीचे राजकारण करून आरक्षण मिळत नसते, त्यासाठी कायदेशीर लढाईच आवश्यक असते. ओबीसीतूनच मराठा समाजास आरक्षण देण्याची मागणी खऱ्या ओबीसीवर अन्याय करणारे असल्याने आम्ही ओबीसी बांधव त्यांच्या सातत्याने निषेध करीत राहू ,ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण मिळावे हा हट्ट त्यांनी सोडल्यास 13 ऑगस्टला त्यांचे नाशकात स्वागत केले जाईल. मात्र आपल्या हट्टाला ते चिटकून राहिल्यास त्यांना ओबीसी तर्फे काळे झेंडे दाखविले जातील. तसेच त्या दिवशी प्रत्येक ओबीसी बांधव आपल्या घरावर काळी गुढी उभारेल, असा इशाराही गजू घोडके यांनी या निवेदनात दिला आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )