





वायकरांच्या नातेवाईकांनी केला, ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वापर

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 16 जून 2024
β⇔नाशिक, दि.16 (प्रतिनिधी :सुरेश इंगळे ):- आता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालाला नवे वळण मिळाले असून वायकर यांच्या नातेवाईकासह दोन जनाविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शिवसेना (उबाठा) उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी मतमोजणी बद्दल आक्षेप घेत निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून मुंबई पोलिसांनी नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकासह दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वायकर यांच्या नातेवाईकांनी ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा सर्रास वापर केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी एफ आय आर नोंदविला असून या प्रकरणात आता वनराई पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा एन कोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपासात पंडिलकर ईव्हीएमसी जोडलेला मोबाईल वापरत असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी इतर उमेदवाराचे जबाब नोंदविले असून लवकरच या संदर्भात अटकवारंट काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंडिलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होत आहे. अहवालानंतर स्पष्ट होईल एन्ट्री पॉईंट्स स्ट्राँग रूम आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. ते मिळाल्यानंतर तपासाला गती मिळेल, पंडिलकर आणि गुरव यांना चौकशीसाठी बोलवून गरज पडल्यास अटक वॉरंट जारी करू असेही पोलिसांनी यावेळी सांगितले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)