β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार :दि. 19 जुलै 2024
β⇔येडशी (धाराशिव), ता.19 (प्रतिनिधी : सुभान शेख ):– धाराशिव तालुक्यातील येडशी येथे राष्ट्रीय राज्य महामार्ग “लातूर-बार्शी ” रोडवरील मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे मागील काही वर्षांपूर्वी बुजवले गेले होते, परंतु नित्कृष्ट पद्धतीने काम केल्यामुळे ते पुन्हा पडले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी पातळ डांबर आणि खडी वापरली जाते, ज्यामुळे खड्डे लवकरच उघडतात. फक्त पंधरा दिवसांत किंवा एका महिन्यातच हे खड्डे पुन्हा पडतात.
यु ट्युब चॅनल ‘दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल’ चे येडशी प्रतिनिधी सुभान शेख यांनी राष्ट्रीय राज्य महामार्ग लातूरच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला होता. अधिकाऱ्यांना माहिती मिळताच, त्यांनी तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवले, पण कामाची गुणवत्ता कमी होती. लातूर-बार्शी रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी शासनाने अनेक वेळा निधी उपलब्ध करून दिला आहे. तरीही, काम अपूर्ण राहिले आहे. गुत्तेदारांनी खड्डे बुजवण्याचे काम अपूर्ण ठेवले आहे आणि या अगोदर दिलेल्या निधीचे पूर्ण वापर झाले नाही. शासनाने दिलेला निधी नेमका कुठे गेला याची तपासणी होऊन, दोषी गुत्तेदारांवर कडक कारवाई करावी. येडशीतील लातूर-बार्शी रोडवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. पहाटेच्या वेळी पुण्याहून लातूरकडे जाणाऱ्या बसगाड्या या रस्त्यावरून जातात. खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. सुग्रीव सोलवट खड्ड्यात पडून त्यांच्या हाताला इजा झाली आहे, शैलेश तपसे यांचे पाय निकामी झाले आहेत आणि दता तुपे यांच्या दोन्ही हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेला जबाबदार कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन, लातूर-बार्शी रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी दिलेल्या निधीची पाहणी करून चौकशीचे आदेश काढावेत आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी येडशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमीशेअर व लाईक करा आणिसबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)
β : येडशी (धाराशिव ):⇔येडशी बसस्थानकात शौचालय सुविधा अभावी प्रवासी महिलांची गैरसोय” परिवहन मंत्री-प्रताप सरनाईक यांना निवेदन, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष-(प्रतिनिधी:सुभान शेख)
2 weeks ago
β : दिंडोरी(नाशिक):⇔जऊळके वणी येथील रंगोत्सव सेलिब्रेशनच्या स्पर्धेत 13 विद्यार्थी ठरले इंटरनॅशनल स्पर्धेसाठी पात्र-(प्रतिनिधी: रावसाहेब जाधव)
2 weeks ago
β : दिंडोरी(नाशिक):⇔सोनजांब येथे वार्षिक गुणगौरव व सांस्कृतिक कार्यक्रमास गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-(प्रतिनिधी: रावसाहेब जाधव)
2 weeks ago
β : नाशिक :⇔’राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांना सामाजिक नितीमूल्य व श्रम संस्काराची शिकवण मिळते’-हरिभक्त परायण प्रा. भगवान महाराज शिंदे-(प्रतिनिधी:शाश्वत महाले)
2 weeks ago
β : येडशी (धाराशिव ):⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज” चॅनल व यूट्यूब चैनल च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त “श्री गणेश ,बार्शी” यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा!( जाहिरात प्रतिनिधी: सुभान शेख,मो.9834516313)
2 weeks ago
β : येडशी (धाराशिव ):⇔”दिव्य भारत बीएसएम न्यूज” चॅनल व “यूट्यूब” चैनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त “मा.श्री. साशंक सस्ते आणि मा.श्री. सुनील पाटील, येडशी,” यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा!-(जाहिरात प्रतिनिधी: सुभान शेख,मो.9834516313)