β : सुरगाणा :⇔ शिक्षक संघटनेचे लोकप्रिय , संयमी नेते कै. प्रभाकर मोतीराम महाले यांचे दुःखद निधन, शिक्षकांचा नेता हरपला
β : सुरगाणा :⇔ शिक्षक संघटनेचे लोकप्रिय , संयमी नेते कै. प्रभाकर मोतीराम महाले यांचे दुःखद निधन, शिक्षकांचा नेता हरपला
शिक्षक संघटनेचे लोकप्रिय , संयमी नेते कै. प्रभाकर मोतीराम महाले यांचे दुःखद निधन , शिक्षकांचा नेता हरपला
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 16 फेब्रुवारी 2024
β⇔ सुरगाणा,दि.15 (प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):- आदिवासी शिक्षक संघटनेचे मितभाषी, सयमी, लोकप्रिय नेतृत्व संस्थापक माजी राज्याध्यक्ष व निवृत्त शिक्षक कै. प्रभाकर मोतीराम महाले (वय ६०) रा. सुरगाणा (तळपाडा लहान) यांचे दिनांक १५ /०२/२०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दुःख निधन झाले. त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न तत्कालीन सोडवले आहेत.त्यांच्या निधनाने सावत्र दुख व्यक्त होत आहे, त्यांच्या निधनाने शिक्षक संघटनेचे मार्गदर्शक हरपल्याची भावना शिक्षकांमध्ये पसरली आहे. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शिक्षकांसह राज्यात दुःख व्यक्त होत आहे.
यावेळी आदिवासी शिक्षक संघटनेचे सरचिटणीस रतन चौधरी, माजी तालुकाध्यक्ष पांडूरंग पवार, विनायक गावीत,सखाराम पवार,सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र पागरिया,रमेश थोरात, रामभाऊ थोरात यांनी मनोगत व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण करण्यात आलीं,ते त्र्यंबकेश्वर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ भागवत शंकर महाले व प्राथमिक शिक्षक गणेश शंकर महाले ( ताहाराबाद ) यांचे चुलते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली,तीन भाऊ, दोन बहिणी, सहा पुतणे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी सुरगाणा येथिल आमटी नदीवर सकाळी 8 : 00 वाजता होणार आहे .
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510