





हुंद्क्याचे शहारे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 15 जानेवारी 2024
β⇔नाशिक रोड, दि.15 (प्रतिनिधी : डॉ.कृष्णा शहाणे):-हुंदक्याचे शहारे या कवयित्री कविता प्रकाश कासार यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित शेकोटी लोककला साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी.जी .शेखर पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष उद्योजक उत्तमराव शिंदे, महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अश्विनीताई बोरस्ते, प्रा.डॉ.कृष्णा शहाणे, सावानाचे संजय करंजकर, किरण सोनार, आदी मान्यवर उपस्थित होते. साहित्यातून माणूसपण घडते, म्हणून साहित्य निर्माण झाले पाहिजे. यासाठी लोककला व साहित्य यांचा मेळ साधला तर निश्चितच साहित्याला वेगळा आयाम प्राप्त होईल, असे प्रतिपादन यावेळी डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी व्यक्त केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो ८२०८१८०८१०