β : नाशिक:⇔नाशिक एक्साईज भरारी पथकाच्या वाहनाला कट मारून उडविले,एकाचा मृत्यू-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक:⇔नाशिक एक्साईज भरारी पथकाच्या वाहनाला कट मारून उडविले,एकाचा मृत्यू-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
नाशिक एक्साईज भरारी पथकाच्या वाहनाला कट मारून उडविले, एकाचा मृत्यू
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. 09 जून 2024
β⇔नाशिक, दि.09 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करतांना सदर वाहनाने एक्साईजच्या नाशिक भरारी पथकाच्या वाहनाला कट मारला, त्यामुळे पथकाची सरकारी स्कार्पियो जीप शेतामध्ये जाऊन उलटली. यामध्ये जीप चालक कैलास गेनू कसबे वय (50)यांचा मृत्यू झाला असून पोलीस जवान राहुल पवार व अजून दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.
अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या भरारी पथकाला मिळाली असता, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाला रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या भरारी पथकाने सापळा रचला होता, अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाचा घोटीपासून नाशिक व नाशिक पासून मनमाड पर्यंत सुमारे दीडशे किलोमीटर अंतरापर्यंत भरारी पथकाची दोन वाहने या वाहनाच्या मार्गावर होती. हरनुल टोल नाक्याजवळ वाहन चालकाने सरकारी वाहनाला कट मारून उडविले. ही घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड मनमाड रस्त्यावर जुना हरनुल टोलनाक्याजवळ सोमवारी (दि.8) पहाटेच्या सुमाराला घडल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेमध्ये स्कार्पियोचे चालक कसबे यांचे नियंत्रण सुटले आणि कार थेट महामार्गावरून एका शेतात जाऊन पलटी झाली. तसेच दुसऱ्या एका खाजगी वाहनालाही अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनाने कट मारून पळून गेले. सुदैवाने दुसरे वाहन पलटी झाले नाही .जखमी जवानांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन घेऊन, गुन्हेगार घटनास्थळावरून फरार झाले. नाशिक ग्रामीण पोलीस व एक्साईज विभागाचे दुसरे पथक त्या वाहनाचा शोध घेत असून गुजरात, मध्य प्रदेश सीमावर्ती नाक्यावर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. लवकरच गुन्हेगारांना ताब्यात घेऊ असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)