





शिक्षकांना आदेशात तासिकांचा उल्लेख असावा , अन्यथा यापुढे सर्व आदेशांवर बहिष्कार टाकणार – संजय पगार (राज्य कार्यवाह ,म.रा.शि. प.)

निफाड तालुका मेळाव्यात कार्यकारिणीचा सत्कार
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 12 मार्च 2024
β⇔निफाड , दि.12 (प्रतिनिधी :रावसाहेब जाधव ): महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग निफाड तालुका मेळावा पिंपळगाव ब.शाळा क्र.२ येथे राज्य कार्यवाह /सरचिटणीस संजय पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये प्रास्ताविक दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी तर मनोगत जिल्हा अध्यक्ष वासुदेव बोरसे, जिल्हा नेते रमेश गोहिल यांनी मनोगत व्यक्त केले.संघटनेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे, जिल्हा नेते रमेश गोहिल,कार्यवाह राजेंद्र खैरनार, कोषाध्यक्ष सुनील आहिरे,कार्याध्यक्ष शांताराम कापसे, तालुका अध्यक्ष रावसाहेब जाधव (दिंडोरी),वैभव उपासनी (इगतपुरी) , जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद धिवरे,प्रतिनिधी- मानसिंग महाले, सहकार्यवाह पुंडलिक शिंगाडे,प्रशांत कोठावदे, सुरेश जाधव,उत्कर्ष कोंडावार,प्रविण सोनवणे,किरण पाटील, नागनाथ गोंड,श्रीकांत बिरासदार,शरफोद्दिन शेख उपस्थित होते.राज्य कार्यवाह संजय पगार यांनी शिक्षक परिषदेने आज पर्यंत शिक्षक बदल्या, वादग्रस्त अधिकाऱ्यांच्या विरोधातील आंदोलन,दिव्यांग न्याय लढा निवड श्रेणी आंदोलनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचे अनुभव कथन केले.

शिक्षक परिषद आंदोलन हाती घेताना कशा प्रकारे तयारी करते व शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांशी योग्य विषयावर योग्य दिशेने चर्चा करून आंदोलन यशस्वी करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला जातो. यापुढे शिक्षक परिषद चटोपाध्याय वेतनश्रेणी, शालेय पोषण आहार, जिल्हा बदली वेतनश्रेणी, महिलांचे प्रश्न, फंड काढणे सुटसुटीत पद्धत कार्यान्वित करणे,शिक्षकांचे वैयक्तिक व सामूहिक प्रमुख प्रश्न सोडवले जातील.
निफाड तालुक्यातील सभासद नोंदणी केल्यानंतर कार्यकारणी पुनर्गठन करण्यात आले. तालुका नेते प्रविण कोळी,तालुकाध्यक्ष- संदिप गायकवाड, सरचिटणीस/कार्यवाह-विलास पानपाटील, कार्याध्यक्ष -उमेश शिंदे ,दिपक मोरे, रत्नाकर दवंगे,कोषाध्यक्ष -अशोक जाधव, कार्यकारी अध्यक्ष -विकास मुळे,संघटन मंत्री -राहुल बच्छाव,परशुराम मोरे,कार्यकारी मंत्री -बापु शिंगाडे,सहकार्यवाह-प्रकाश कदम,सचिन गुंजाळ, प्रसिद्धी प्रमुख -शैलेश गुंजाळ, कार्यकारी उपाध्यक्ष – माणिकराव बोरस्ते,उपाध्यक्ष -राजेंद्र सोनजे,किशोर मोरे, साहेबराव सोनवणे, जनार्दन बैरागी,अरविंद राठोड , पदवीधर प्रतिनिधी सुरेश जाधव,तालुका प्रतिनिधी महेन्द्र वाघ,नरहरी वाघमारे, रविंद्र सोसे महिला आघाडी प्रमुख -रजनी दशपुते, महिला प्रतिनिधी जयमाला जगताप,पल्लवी शेंदुर्से, मिरा बिरारी सेवानिवृत्त प्रतिनिधी किशोर मेणे,रेखा पाटील ,वैशाली जाधव यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रिती कामडी यांनी तर आभार रमेश गोहिल यांनी मानले.
” संजय पगार यांच्यासारख्या अभ्यासून नेतृत्वामुळे शिक्षकांना न्याय मिळत आहे. निफाड येथील सर्व शिक्षक बंधू भगिनी हे शिक्षक परिषदेसोबत आहे व यापुढेही राहणार असून शिक्षक बांधवांनो सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिक कार्य करणाऱ्या शिक्षक नेत्याला साथ देऊया” –प्रविण कोळी (तालुका नेते ),महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, निफाड
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510