सह्याद्री करिअर अकॅडमीचा “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” व्याख्यान संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 25 डिसेंबर 2023
β⇔ येडशी (धाराशिव ) , ता.25 ( प्रतिनिधी : सुभान शेख ) :– धाराशिव येथील सहयाद्री स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अंतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक अभिजीत जगताप (PSI) यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोज जाधव (पत्रकार), विठ्ठल अप्पा खरे, सुरज इंगळे(उपसरपंच कनगरा), मेजर शकील शेख(मुंबई पोलीस) कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहयाद्री अकॅडमीचे संचालक प्रा. सिद्धेश्वर मते उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमुख वक्ते अभिजीत जगताप यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा आणि ग्राउंडची तयारी करत असताना कशा पद्धतीने सराव करावा याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले,मनोज जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या आई वडिलांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास कसा सार्थ ठरवावा,स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांनी राजकारणात न पडता आपल्या अभ्यासाला महत्त्व द्यावे , असे सांगून मुलांना प्रोत्साहित केले. विठ्ठल खरे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सातत्य असणे किती गरजेचे आहे. या बद्दल विचार मांडले.
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सुजित पवार ,अजित रणदिवे , सुदर्शन पौळ यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाला सहयाद्री अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी घोडके हिने तर आभार प्रदर्शन क्लासचे संचालक प्रा.शेंदरे सर यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०