Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिक :⇔’बदलत्या निष्ठा ह्या  “वाणिज्य आणि व्यवस्थापन” क्षेत्रातील चिंताजनक बदल आहे’- डॉ.विनायक गोविलकर – (प्रतिनिधी : छाया लोखंडे-गिरी)

β : नाशिक :⇔'बदलत्या निष्ठा ह्या  "वाणिज्य आणि व्यवस्थापन" क्षेत्रातील चिंताजनक बदल आहे'- डॉ.विनायक गोविलकर - (प्रतिनिधी : छाया लोखंडे-गिरी)

0 1 2 9 1 1

‘बदलत्या निष्ठा ह्या  “वाणिज्य आणि व्यवस्थापन” क्षेत्रातील चिंताजनक बदल आहे’डॉ.विनायक गोविलकर

β : नाशिक :⇔'बदलत्या निष्ठा ह्या  "वाणिज्य आणि व्यवस्थापन" क्षेत्रातील चिंताजनक बदल आहे'- डॉ.विनायक गोविलकर - (प्रतिनिधी : छाया लोखंडे-गिरी)
β : नाशिक :⇔’बदलत्या निष्ठा ह्या  “वाणिज्य आणि व्यवस्थापन” क्षेत्रातील चिंताजनक बदल आहे’- डॉ.विनायक गोविलकर – (प्रतिनिधी : छाया लोखंडे-गिरी)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिकमंगळवार : दि, 9 जानेवारी 2024

β⇔,नाशिक, दि.9( प्रतिनिधी : छाया लोखंडे-गिरी  ):- बदलत्या निष्ठा ह्या ” वाणिज्य आणि व्यवस्थापन” क्षेत्रातील चिंताजनक बदल आहे , असे प्रतिपादन डॉ.विनायक गोविलकर यांनी केले. एस एम आर के महिला महाविद्यालयात वाणिज्य सप्ताहाच्या अंतर्गत आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. आपल्या उद्घाटन सत्रातील भाषणात त्यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील गेल्या ५० वर्षांत झालेल्या बदलांचा आढावा घेतला.जागतिकीकरणानंतर झालेल्या महत्वाच्या आर्थिक स्थित्यंतरांपैकी महत्वाचे म्हणजे पैशाच्या मागे धावताना माणसा – माणसातील तुटलेला संवाद,सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि भांडवलकेंद्री अर्थरचना! सध्याची बाजारपेठ ही उत्पादन प्रधान नसून कृत्रिम मागणी प्रधान आहे. आउट सोर्सिंग,कंत्राटी श्रमिक यांमुळे एकूणच अर्थप्रणाली बदलून गेली आहे. हे चर्चासत्र गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ.दीप्ती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आले होते.

            उद्योग क्षेत्रातील अस्थिरता,आर्थिक घटकांचे भांडवलिकरण,बदलती कार्य संस्कृती आणि नैतिकतेची बदललेली संज्ञा ही आजच्या काळातील प्रमुख आव्हाने आहेत.उद्घाटन सत्राच्याअध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कविता पाटील होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी गतिमान युगातील आर्थिक विकासाबरोबर आवश्यक असणारे शाश्र्वत मूल्यांचे महत्व अधोरेखित केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ . निलम बोकील उपस्थित होत्या. उपप्राचार्य डॉ.नितीन सोनगिरकर यांनी प्रास्ताविक आणि मान्यवरांचा परिचय करुन दिला.प्रारंभी संगीत विभागाच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत आणि विद्यापीठ गीत सादर केले. डॉ.महेंद्र धोंडगे पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.गीतांजली गीते यांनी सूत्र संचालन केले.

सौ.प्रणेता निकुंभ, यशवंत केळकर ,डॉ.आश्लेषा कुलकर्णी,वैशाली गायकवाड ,संजोग अहिरवर,मनीषा जोशी, वैशाली चौधरी, संदीप ओढेकर,हेमा देशमुख यांनी संयोजन केले. या चर्चासत्राच्या प्रथम सत्रात प्रसिद्ध सी ए महेंद्र चतुरमुथा यांनी शेअर बाजारातील घडामोडींचा रंजक वेध घेत विद्यार्थीनींनी गुंतवणुकीचे नियोजन कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात विंजित संस्थेचे  मकरंद सावरकर यांनी तंत्रज्ञान,वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रातील परसपरानुबंध स्पष्ट करतानाच तंत्रज्ञानाची अपरिहार्यता सांगितली.या चर्चासत्राला विविध शहरांतून चांगला प्रतिसाद मिळाला.काही शोधनिबंधांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. समारोपाच्या सत्रात प्रमुख अतिथी प्रसिद्ध उद्योजक पीयूष सोमाणी यांनी विद्यार्थीनींनी आपल्या सर्व क्षमतांचा उपयोग करून यश मिळवावे असे सांगितले. आत्मपरीक्षण करत वाईट सवयींचा त्याग करत आणि चांगल्या सवयी आत्मसात करून व्यक्तिमत्व विकसित करावे. स्वयं नियंत्रण हाच हमखास यशाचा मार्ग आहे असे ते म्हणाले .

           गोखले एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.आर पी देशपांडे यांनी या चर्चा सत्राच्या विषयाचे महत्त्व आणि उपयुक्तता स्पष्ट करतानाच विद्यार्थीनींनी यशस्वी करिअरसाठी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावी, असे सांगितले. वाणिज्य सप्ताहाच्या अंतर्गत येत्या आठवड्यात डॉ. ए.एम.शेख,एड.राधिका देशपांडे यांची ई कॉमर्स तसेच सायबर लॉ या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.  हल्डेक्स प्रायव्हेट लिमिटेड ,अंबड येथे क्षेत्र भेट आयोजित केली होतो . 

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:  मो ८२०८१८०८१०

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!