Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

बिटको महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त व्याख्यान व प्रात्यक्षिके सादर.. 

बिटको महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त व्याख्यान व प्रात्यक्षिके सादर.. 

0 1 2 9 1 1

बिटको महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त व्याख्यान व प्रात्यक्षिके सादर..

 दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज : प्रतिनिधी नाशिकरोडसंजय परमसागर 
नाशिकरोड (दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज  ) :- ” २१ जून वर्षातील सर्वात मोठा दिवस . या दिवशी आपण योग केल्यास आपले शरीर व आरोग्य उत्तम राहते . जीवनात योगासनाचे स्थान अमूल्य आहे . आपले शरीर व मन स्वस्थ ठेवणे त्यासाठी प्रत्येकाने योगासने , प्राणायाम , योगा , सूर्यनमस्कार नियमित करावेत . त्यामुळे मनावर , विचारांवर , शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात योग व आसने गुरूंच्या व तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावेत ,” असे मार्गदर्शन करताना योग विद्याधामच्या ट्रेनर डॉ. निवेदिता खोत यांनी केले .
‌ गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात दि. २१ रोजी जून जागतिक योग दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागा वतीने जिमखाना हॉलमध्ये डॉ. निवेदिता खोत यांचे ‘ दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्याप्रसंगी त्या उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर बोलत होत्या . याप्रसंगी रोहिणी पाटील , रीना सुजगुरे , निकिता पवार , साशा रामसिंघानी यांच्या समवेत विद्यार्थी व शिक्षकांनी सूर्यनमस्कार , विविध आसने , ध्यानधारणा , मुद्रा व प्राणायाम करुन प्रात्यक्षिके सादर केली . याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ मंजुषा कुलकर्णी , उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे , विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ. के. सी. टकले , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ सुनिता नेमाडे , पर्यवेक्षिका सौ. प्रणाली पाथरे , प्रा. गणेश दिलवाले , विद्यार्थी विकास कार्यक्रमाधिकारी डॉ. विशाल माने , डॉ.के.एम. लोखंडे,डॉ.डी.जी. शिंपी , क्रीडा संचालक धनंजय बर्वे आदी उपस्थित होते . प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार यांनी स्वागत व प्रस्ताविक केले . डॉ. खोत यांनी आपल्या व्याख्यानात योग म्हणजे शरीराचे मनाशी जोडणी असून प्रत्येक जण उपासना , साधनेद्वारे स्फूर्ती योग करत असतो . महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की- २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस या दिवशी आपण योगा केल्यास आपले शरीर व आरोग्य उत्तम राहते . योग आपल्या दैनंदिन आयुष्यातील दिनचर्येचा भाग असावा त्यामुळे व्याधीविकारांपासून मुक्ती मिळते . आपल्या भारतात ५ हजार वर्षापासून योगाभ्यासाची परंपरा सुरू आहे . दररोज योगाभ्यास केल्यास त्याचा फायदा होऊन शरीर स्वस्थ , निरोगी व आनंदी राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधाकर बोरसे यांनी केले तर आभार डॉ. कांचन सनानसे यांनी मानले .
 दिव्य भारत बी.एस. एम. न्यूजमुख्य संपादक : डॉ. भागवत महाले, मो . ९४२३०७०८०६ / ८२०८१८०५१० 
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!