β : नाशिक(शहर ):⇔२८ सप्टेंबरला ‘रंग स्पर्श चित्र’ प्रदर्शनाचे उद्घाटन-(प्रतिनिधी : छाया लोखंडे)
β : नाशिक(शहर ):⇔२८ सप्टेंबरला 'रंग स्पर्श चित्र' प्रदर्शनाचे उद्घाटन-(प्रतिनिधी : छाया लोखंडे)
२८ सप्टेंबरला ‘रंग स्पर्श चित्र’ प्रदर्शनाचे उद्घाटन
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 28 सप्टेंबर 2024
β⇔नाशिक(शहर ,दि,28 (प्रतिनिधी : छाया लोखंडे ):गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस. एम. आर. के. महिला महाविद्यालयाच्या चित्रकला विभागात आयोजित वार्षिक ‘रंगस्पर्श’ कला प्रदर्शनाचे उद्घाटन २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता प्रसिद्ध आर्किटेक्ट संजय पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन १ ऑक्टोबरपर्यंत सर्वांसाठी खुले असेल. या प्रदर्शनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम म्हणून ऋषिकेश भांडारे यांचे व्यक्तिचित्रण आणि संध्या केळकर व ऋतिका ओसवाल यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
रंगस्पर्श’ हे प्रदर्शन त्याच्या १८व्या वर्षात पदार्पण करत असून, यात बीव्हीए (बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स) आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या कलाकृतींचा समावेश आहे. बीव्हीएच्या विद्यार्थिनींनी “म्युरल” या विषयावर विविध माध्यमांचा वापर करून प्रयोगशील कलाकृती साकारल्या आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर यांच्या प्रेरणेने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपप्राचार्य डॉ. नितीन सोनगीरकर आणि समन्वयक डॉ. अविराज तायडे यांनी या प्रदर्शनासाठी मार्गदर्शन केले आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांनी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
हे प्रदर्शन सर्व नाशिककरांसाठी खुले आहे, त्यामुळे कला रसिकांनी अवश्य भेट द्यावी.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )