ठक्कर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी “कलावेध- 2k24” चा जल्लोष
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि, 15 फेब्रुवारी 2024
β⇔ नाशिक, दि.14 (प्रतिनिधी : चेतना कापडने ):- श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती नर्मदाबेन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी वार्षिक सांस्कृतिक “कलावेध- 2k24” महोत्सवांतर्गत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थीनी जल्लोष साजरा केला. विद्यार्थीनी कॉलेजमध्ये बॉलीवूड आणि समूह दिवस साजरा केला. त्यांनी शिवरायांच्या मावळ्यांची, राम सेनेची, मनी हायस्टची विविध थीम्सचा वेशनिर्देश , काही इतर बॉलवूड सेलेब्रिटींच्या वेशात अनुकरण केले.
सांस्कृतिक महोत्सव शुक्रवारपर्यंत संचालित राहील. आगामी दिवसांत हॅलोवीन दिवस, पारंपारिक दिवस साजरे केले जातील. तसेच अंगभूत कौशल्याची भेट म्हणून योग्य विजेत्यांना चॅम्पियनशिप ट्रॉफी दिले जाईल. ठक्कर महाविद्यालयाच्या प्रगणात होणार्या ह्या दिवसांसाठी विद्यार्थांची उत्सुकता वाढली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510