पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त चिकाडीत नारी शक्ती पुरस्कार प्रदान
दिव्य भारत बी.एस.एम. न्यूज वृत्तसेवा : सुरगाणा प्रतिनिधी – एकनाथ शिंदे
सुरगाणा, ता .३१ ( दिव्य भारत बी.एस.एम.न्यूज वृत्तसेवा ) : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिकाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने नारी शक्तीचा सम्मान करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट समाजसेवा करणाऱ्या दोन महिलांचा ग्रुप ग्रामपंचायत वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये कमळाबाई गवळी यांना कीर्तनाच्या माध्यमातुन जनजागृती करणे व नंदा कैलास गायकवाड यांचा महिला बचत गटाच्या सी.आर.पी. म्हणून उल्लेखनीय काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रमाणपत्र,ट्रॉफी, श्रीफळ व शाल व पाचशे रुपये देऊन गौरवण्यात आले.यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सदू बागुल,सदस्या-रेशमा गायकवाड, जना शिंदे, अंगणवाडी सेविका वत्सला मौळे, मैना बागुल, भास्कर बागुल, मुरलीधर बागुल व अंगणवाडी सेविका राधिका राऊत व शिपाई देविदास वाघमारे आदी उपस्थित होते.
____________________________________________________________________________________________________
दिव्य भारत बी.एस.एम.न्यूज : मुख्य संपादक –डॉ भागवत महाले , उपसंपादक – लीना महाले
____________________________________________________________________________________________________