नवनीत फाउंडेशनतर्फे तिसगाव शाळेला टेलिव्हिजन भेट; दिंडोरी तालुक्यात 10 टेलिव्हिजनचे ई -सॉफ्टवेअर सहित वाटप
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि. 12 जून 2024
β⇔दिंडोरी (नाशिक), दि.12(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव):-नवनीत फाउंडेशन, मुंबई यांच्यावतीने ग्रामीण भागातील शाळांत आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत असतात व विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीचे असते. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून शाळेने मागणी केल्याप्रमाणे शाळेसाठी एलईडी टीव्ही व अभ्यासक्रम क्रमवार आधारित ई लर्निंग सॉफ्टवेअर नवनीत फाउंडेशन व अटोज प्रेयस फाउंडेशन तर्फे संतोष साळवे, साईप्रसाद बार्ला यांचे हस्ते तर पदवीधर शिक्षक विलास पाटील यांचे सहकार्याने देण्यात आले.
याप्रसंगी सरपंच कु. समृद्धीदीदी भालेराव, उपसरपंच श्री किशोर बागुल, श्री बबलूभाऊ भालेराव , श्री चिंतामण भदाणे पदवीधर शिक्षक भातोडे , श्री वाघमारे(भातोडे) तसेच मुख्याध्यापिका ताईबाई आहिरे ,पदवीधर शिक्षक रावसाहेब जाधव, दीपक वसावे, अरुणा जाधव, प्रमोद देवरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी नवनीत व अटोज प्रेयस फाउंडेशन यांचे शाळेच्या व ग्रामपंचायत च्या वतीने आभार मानण्यात आले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)