





येडशी बसस्थानकात शौचालय सुविधा अभावी प्रवासी महिलांची गैरसोय”
परिवहन मंत्री – प्रताप सरनाईक यांना दिले निवेदन, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि.29 जानेवारी 2025
β : येडशी (धाराशिव ):⇔येडशी बसस्थानकात शौचालय सुविधा अभावी प्रवासी महिलांची गैरसोय” परिवहन मंत्री-प्रताप सरनाईक यांना निवेदन, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष-(प्रतिनिधी:सुभान शेख)
- β⇔येडशी (धाराशिव )दि.29 (प्रतिनिधी: सुभान शेख ):-धाराशिव तालुक्यातील येडशी येथील मिळालेल्या माहितीनुसार अशी की , मागील काही वर्षांपासून येडशी बसस्थानक परिसरातील शौचालयाचे काम अर्धवट गुत्तेदारने सोडून दिले आहे. त्यामुळे शौचालयाचे काम अर्धवट रखडलं आहे. सदर बाब अतिशय महत्वाची असताना कोणीही किंवा एसटी महामंडळाचे धाराशिव आगाराचे वरिष्ठ अधिकारी एकही आजपर्यंत आले नाही. या शौचालयाच्या नावाने “यु ट्युब चॅनल” – “दिव्य भारत बीएसएम न्यूज” चे प्रतिनिधीने बसस्थानक परिसरातील अर्धवट काम सोडलेले शौचालयाकडे धाव घेऊन, दि.11 जानेवारी रोजी “येडशी बसस्थानकावर महिला शौचालयाचा अभाव , प्रवासी महिलांची गैरसोय”, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष “, अशी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. बातमी प्रकाशित करुनही एसटी महामंडळाचे धाराशिव आगाराचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जनसेवेसाठी असलेली एसटी महामंडळ प्रवाश्यांना सोयी सुविधा न देता हाल सुरु आहेत.सदर बाबतीत विवेदन व बातमी प्रकशित होवून देखील अधिकारी वर्ग गाभिर्यांनी घेत नाही, उर्मटपने वर्तन करत आहेत.
येडशी प्रतिनिधी ने सतत वारंवार फोन केले होते. परंतु तरीही कोणीही दखल घेतली नाही. नेमके येडशी बसस्थानक परिसरातील शौचालयाचे काम करण्यासाठी शासना कडून आलेले निधी वरिष्ठ अधिकारी यांच्या घशात की , गुत्तेदारच्या खिशात असा प्रश्न उपस्थित जनता विचारत आहेत. हि बातमी प्रकाशित होताच, येडशी ग्रामपंचायत सदस्य – सुनील पाटील यांनी शौचालयाचे काम करण्यासाठी व रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी दि. 26 जानेवारी रोजी धाराशिव जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री व पालकमंत्री – प्रताप सरनाईक यांना निवेदन दिले आहे. येडशी प्रतिनिधीने धाराशिव आगाराचे विभागीय अधिकारी – शशिकांत उबाळे यांना फोन वरून शौचालयाचे कामबाबत माहिती दिली असता त्यांनी येडशी ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील यांना फोन केले. परंतु , ग्रामपंचायत सदस्य यांनी माहिती सांगितली की , या अर्धवट काम असलेले शौचालयाचे काहीही उपयोग होणार नाही. या शौचालयला नुतन काम दुसऱ्यांदा करावे लागेल असे सांगितले आहे. त्यानंतर आगाराचे विभागीय अधिकारी – शशिकांत उबाळे यांनी ग्रामपंचायत सदस्य – सुनील पाटील यांना फोन द्वारे सांगितले कि आम्हीही काहीही करू शकत नाही. असे सांगितले आहे.
मात्र प्रवाशी , विद्यार्थी , शेतकरी,व्यापारी ,शेतमजूर यांना येडशी बसस्थानक मध्ये दिवसभर आणि रात्रीही बसेस ये – जा करत असतात. बसेस मधील किंवा बसस्थानक परिसरातील प्रवासी महिलांना शौचालयला जाण्यासाठी काही अडचण आली तर ,या महिलांनी जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण होत आहे. तरी धाराशिव जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री व पालकमंत्री – प्रताप सरनाईक यांनी लवकरात – लवकर दखल घेऊन , दुसऱ्यांदा नुतन शौचालय बांधण्यासाठी आदेश देण्यात यावे आणि पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा , येडशी ग्रामपंचायत सदस्य – सुनील पाटील यांना शौचालयाचे काम करण्यासाठी परवानगी देण्यात यावे. व अर्धवट काम असलेले शौचालयाचे निधी कुठे गेले ? या शौचालयाचे काम राहिलेले कसुन चौकशी करावी. अशी मागणी प्रवासी महिलांतुन होत आहे. -
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )