सायखेडा विद्यालयाचा सर्वाधिक निकाल लागल्याबद्दल समाजदिन कार्यक्रमात फिरती ढाल प्रदान
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: नाशिक : सोमवार, दि. 21, ऑगस्ट 2023
β⇒ सायखेडा, ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम ) :- सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा एच. एस. सी. बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल 96.85%लागला असून समाज दिनाचे औचित्य साधून शाळेचा गौरव करण्यात आला . मविप्र संस्थेत सर्वाधिक निकाल लागल्याबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक येथील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात येथे आयोजित समाजदिन कार्यक्रमात विविध शाळांचा सन्मान करण्यात आला . यावेळी मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस अँड.नितीनरावजी ठाकरे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष श्री.विश्वासराव मोरे,उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी यांचे शुभ हस्ते अॅड. भास्करराव पवार यांचे कडून वडील कै.आनंदराव पवार स्मृती प्रीत्यर्थ फिरती ढाल कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य नवनाथ निकम व कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक यांना प्रदान करून गौरविण्यात आले.
विद्यालयाच्या दृष्टीने निश्चितच गौरवास्पद असून शिक्षकांनी केलेल्या कामाचे ते फलित आहे. निकाल अनुक्रमे :- विज्ञान-100% कला- 94.28% वाणिज्य- 97.64% एच.एस.व्ही.सी. 95.34% इयत्ता दहावी निकाल:- 94.40% विद्यालयाच्या नैपुण्य पूर्ण यशाबद्दल निफाड तालुका मविप्र संचालक श्री शिवाजी आप्पा गडाख, सिनियर महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष निर्मलाताई खर्डे,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष कमलाकांताचार्य महाराज, शालेय समिती अध्यक्ष श्री विजू आण्णा कारे, अभिनव बाल विकास शालेय समिती अध्यक्ष जगन्नाथ डेरले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गावले ,पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष जगन आप्पा कुटे शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके,डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे,डॉ.नितीन जाधव, लक्ष्मणराव टर्ले,संजय कांडेकर, वसंत मोगल, रतन कांडेकर, सरपंच गणेश कातकाडे रमेश पावशे,दिलीप शिंदे,कृष्णा आघाव, जि.प. सदस्य सुरेश कमानकर, वसंतराव कारे,भाऊसाहेब कातकाडे ,अशपाक शेख व सर्व शालेय समिती सदस्य सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यालयाचे या नेत्रदीपक यशाबद्दल पंचक्रोशीत सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०
