सुरगाणा नूतन विद्यामंदिर विद्यालयात “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात
β : बोरगाव (सुरगाणा ):⇒सुरगाणा नूतन विद्यामंदिर विद्यालयात “वाचन प्रेरणा दिन”उत्साहात साजरा– ( प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल )
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 17 ऑक्टोबर 2023
β⇒बोरगाव (सुरगाणा ), ता .16 ( प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल ) :- सुरगाणा येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित नूतन विद्यामंदिर विद्यालयात देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व पर्यवेक्षक एस. एन. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन प्रेरणा दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जी. एन. सोनार यांनी सर्वप्रथम वाचन प्रेरणा दिवस का साजरा केला जातो, यामागील उद्देश काय याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. कलाम यांना वाचनाची असलेली आवड, त्यांच्या जीवनातील साधेपणा, विद्यार्थ्यांबद्दल असलेले त्यांचे प्रेम व कळकळ याबद्दल आपले विचार व्यक्त केले.
त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात वाचनाचे अनंत फायदे विद्यार्थ्यांना सोदाहरण पटवून दिले. तदनंतर वाचन कट्टा अंतर्गत विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांसमवेत वाचन उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. हिंदी, मराठी, इंग्रजी भाषांचे अस्खलित वाचन विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अन्वर मन्सुरी यांनी केले, फलक लेखन श्रीराम पाटील यांनी केले.तर आभार ए. एस. थोरात यांनी मानले.
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा: मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०
