β : सुरगाणा : ⇔कळवण प्रांताधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर तुळशीराम खोटरे यांचे उपोषण मागे , तत्काळ ऍम्ब्युलन्स देणार – ( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे )
β : सुरगाणा : ⇔कळवण प्रांताधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर तुळशीराम खोटरे यांचे उपोषण मागे , तत्काळ ऍम्ब्युलन्स देणार - ( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे )
कळवण प्रांताधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर तुळशीराम खोटरे यांचे उपोषण मागे , तत्काळ ऍम्ब्युलन्स देणार
β : सुरगाणा : ⇔कळवण प्रांताधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर तुळशीराम खोटरे यांचे उपोषण मागे , तत्काळ ऍम्ब्युलन्स देणार – ( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे )
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :रविवार : दि 23 ऑक्टोबर 2023
β⇔ सुरगाणा, ता 22 ( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे ) :- सुरगाणा तहसील कार्यालय येथे गेल्या 10 दिवसापासून आमरण उपोषणास बसलेले तुळशीराम खोटरे यांच्या प्रमुख मागण्या उंबरठाण 108 -ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देणे, प्रा. आ. केंद्र पांगरणे एक 102 ऍम्ब्युलन्स व पिंपळसोंड येथे मुक्कामी बस आदी मागण्यासाठी उपोषण सुरु होते. आज दि 22 ऑक्टोबर रोजी कळवण प्रांताधिकारी विशाल नरवाडे यांच्या वरील मागण्याची लेखी आश्वासन देवून पूर्ण केल्या व बाकी मागण्या शासन दरबारीं पाठपुरावा करण्याचे ठोस आश्वासन दिले . त्यामुळे तुळशीराम खोटरे यांनी मागण्या पूर्ण होत असल्याने स्वतः प्रांताधिकारी विशाल नरवाडे यांनी उपोषण सोडण्यास सांगितले आणि लिंबू पाणी देऊन उपोषण सोडले. त्यामुळे तुळशीराम खोटरे यांच्यासाठी उद्या होणारे आंदोलन तूर्त स्थिगित केल्याचे तुळशीराम खोटरे यांनी विविध संघटनांनी दिलेला पाठींबा व आंदोलनाचा इशारा उपस्थित मान्यवरांच्या निर्णयाने आंदोलन स्थगीत केले आहे .शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास पुन्हा गुजरात जोडोसारखे आंदोलन करण्याची वेळ येवू नये. अशी विनंती आज सर्वांनी प्रांताधिकारी यांना केली.
सदर आंदोलनासाठी विविध मान्यवरांनी कळतं नकळत जो पाठिंबा दिला. सर्व संघटनांचे व प्रतिनिधींचे उपोषणकर्त्याने मनापासून आभार मानले. एक उच्च शिक्षित आदिवासी युवक 10 दिवस आमरण उपोषणास बसूनही कोणीही दखल घेतली नव्हती. मात्र प्रांताधिकारी विशाल नरवाडे यांनी योग्य तोडगा काढून उपोषण करत्यास न्याय दिला. यावेळी सोबत तहसीलदार कुलकर्णी , नायब तहसीलदार पाडेकर ,तालुका मेडिकल ऑफिसर रणवीर ,आदिसह सदर उपोषण सोडविण्यासाठी प्रशासन उपोषणकर्त्याबरोबर योग्य संवाद साधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी राजकीय नेते सुरगाणा सीमा संघर्ष समितीचे- सचिव रंजित गावित, सुरगाणा प. सं. माजी सभापती मंदाकिनी भोये हे उपस्थित होते .सुरगाणा तालुक्यातील विविध पक्षाचे नेते राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व सुरगाणा सीमा संघष समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते चिंतामण गावित , अलंगूनचे सरपंच हिरामण गावित, आदिवासी बचव अभियान सरोजताई भोये, माजी नगरसेवक सुरेश गवळी, युवा नेते महेश तुंगार, भाजपा नेते एन. डी. गावित, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष भास्कर चौधरी, रमेश थोरात, नितीन गावित, संजय चव्हाण आदीसह सर्व आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उपोषण सोडले.
त्यामुळे तुळशीराम खोटरे यांच्यासाठी उद्या होणारे आंदोलन तूर्त स्थिगित करण्यात आले आहे, असे तुळशीराम खोटरे यांनी उपस्थित मान्यवांच्या निर्णय घेऊन सांगितले. शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास पुन्हा गुजरात जोडोसारखे आंदोलन करण्याची वेळ येवू नये. अशी विनंती आज सर्वांनी प्रांताधिकारी विशाल नरवाडे यांना केली.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०