बिटको महाविद्यालयातप्रिं. टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन साजरा !
β⇒ दिव्य भारत बी एस एम, न्यूज वृत्तसेवा :नाशिक : मंगळावर ,दि. ५ सप्टेंबर २०२३
β⇒ नाशिकरोड ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात शिक्षणाचा खरा अर्थ आपल्या आचार आणि विचारातून सांगणाऱ्या आणि शिक्षक हा उत्तम प्रशासक होऊ शकतो हे दाखवून देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी प्राचार्य टी. ए. यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच त्यांच्या कार्याचा उजाळा उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर उलगडला . याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पाठारे , डॉ. आकाश ठाकूर , डॉ. सुधाकर बोरसे , डॉ. विशाल माने , डॉ. विद्युल्लता हांडे , डॉ. कांचन सनानसे , डॉ. विजय सुकटे यासह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते . शिक्षकांना यावेळी शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या . कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही यावेळी शिक्षकांना गुलाब पुष्प भेट दिले . भूगोल विभागातही शिक्षक दिन विद्यार्थ्यांनी साजरा केला .
दिव्य भारत बी एस एम, न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले , मो ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)