β : दिंडोरी(नाशिक):⇔महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघातर्फे तहसीलदार यांना निवेदन “शिक्षक दिन ” हा “अन्याय दिन” म्हणून साजरा-(प्रतिनिधी : प्रा.नामदेव जगताप)
β : दिंडोरी(नाशिक):⇔महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघातर्फे तहसीलदार यांना निवेदन "शिक्षक दिन " हा "अन्याय दिन" म्हणून साजरा-(प्रतिनिधी : प्रा.नामदेव जगताप)
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघातर्फे तहसीलदार यांना निवेदन “शिक्षक दिन “ हा “अन्याय दिन” म्हणून साजरा
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 06 सप्टेंबर 2024
β⇔ दिंडोरी(नाशिक),दि.06 (प्रतिनिधी : प्रा.नामदेव जगताप ):-दिंडोरी येथे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या वतीने विविध मागण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या मागण्याची पूर्तता होत नसल्याने “शिक्षक दिन” हा “अन्याय दिन”म्हणून साजरा करण्यात आला.
सदर निवेदनात म्हटले आहे,की शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात देशभर शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन होत असून 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी, आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, वाढीव पदांना मान्यता, 2005 पूर्वी अर्धवेळ, विनाअनुदानित तत्वावरील शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी. त्याचबरोबर 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन, आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, निवृत्तीचे वय वर्षे 60 करावे. पी.एचडी.,एम.फील, एम.एड धारकाना वेतन वाढ दयावी. Nps/ Dcps चा हिशोब देण्यात यावा, अशा विविध मागण्यासाठी दिंडोरी तालुका महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या वतीने तहसीलदाराना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महासंघाचे तालुका अध्यक्ष प्रा.एस.पी.कदम, प्रा.एस.जे. ऊफाडे, प्रा.व्ही. व्ही. विंचूरकर, प्रा.एन.आर जगताप, प्रा.श्रीमती शेवाळे पी.एस., प्रा.साबळे, प्रा.घोरपडे, प्रा.घडवजे, प्रा.पवार, प्रा.बच्छाव, यांसह विविध शिक्षक, शिक्षिका आदी मान्यवर उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )