त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 21 फेब्रुवारी 2024
β⇔त्र्यंबकेश्वर,दि.21 (प्रतिनिधी : प्रा.समाधान गांगुर्डे):- येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला ,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांनी अध्यक्षस्थानी होते. या मेळाव्याला कला, व वाणिज्य विभागातून जवळपास 72 माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे कोषाध्यक्ष सुभाष सोनवणे हेही उपस्थित होते. त्यांनी माजी विद्यार्थी संघ व त्याचे कार्य व आगामी कार्याचा आढावा घेतला.महाविद्यालयासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुढे येऊन काय काम करायला हवे आहे याविषयी मते व्यक्त केली गेली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात ” हे महाविद्यालय तुमचे आहे व त्याच्या जडणघडणीत तुमचे योगदान महत्त्वाचे असून महाविद्यालयाच्या यापुढील वाटचालीस देखील तुमची भूमिका व योगदान हे महत्त्वाचे ठरणार आहे. NAAC च्या निकषानुसार विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा कशा मिळतील यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो. माजी विद्यार्थ्यांनी वेळ काढून आपल्या विभागासाठी मार्गदर्शन,यशोगाथा कथन, ग्रंथ,साहित्य वा अन्य स्वरूपाची मदत करावी.ज्यामुळे आजी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल.महाविद्यालयाशी सतत अतूट स्नेहबंध जोडलेले राहिल्यास कॉलेज विकासाला हातभार लागेल. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाशी असलेले आपले भावनिक नाते कायम जपावे.” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या मेळाव्याला कला, व वाणिज्य विभागातून जवळपास 72 माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदवली.
(माजी विद्यार्थी -अक्षय परदेशी )
यावेळी माजी विद्यार्थी अक्षय परदेशी, ज्योती निरगुडे, ज्योती आहेर, आबा जाधव, धीरज राजपूत,सतीश मिंदे,लक्ष्मण गुंड, कोमल सोनवणे, सागर ताठे,योगेश भिवसेन, बाळकृष्ण कामकाटे,आकाश व्यवहारे,देवनाथ खेडकर, अनिकेत गांगुर्डे,अजय जगताप, पार्थ मोरे,अतुल सांगळे, यमुना पिठोळे, इत्यादी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय विषयी असलेले आपले मत मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक हिंदी विभागप्रमुख प्रा. समाधान गांगुर्डे यांनी केले तर उपस्थितांचे आभार वाणिज्य विभागप्रमुख प्रा. नीता पुंणतांबेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला, वाणिज्य शाखेच्या सर्व विभाग प्रमुख व सहकारी प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510