





सायखेडा विद्यालयात कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांना अभिवादन
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि ९ ऑक्टोबर २०२३
β⇒ सायखेडा ता ९ ( प्रतिनिधी :राजेंद्र कदम) :- जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री नवनाथ निकम यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री नवनाथ निकम होतेअध्यक्षपदावरून बोलताना ते म्हणाले की शिस्त गुणवत्ता पारदर्शकता यात्रिसूत्रीचा अवलंब करून कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार यांनी संस्थेत बदल घडवून आणला व संस्थेस प्रगतीपथावर नेले यावेळी विद्यालयातील उपशिक्षिका प्रतिक्षा शिंदे यांनी कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला संचिता कांडेकर वेदिका जाधव या विद्यार्थिनींची भाषणे केली या कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री दौलत शिंदे, संजय बोरगुडे ,संजय चौधरी, शरद वाणी, सोमनाथ शिंदे, श्री भोई, महेंद्र मोरे ,मच्छिंद्र गोहाड, विलास महाले ,अरुण सावंत ,वृषाली शिंदे, पंकज गांगुर्डे ,पद्माकर पंगे ,ज्ञानेश्वर करपे, सीमा गोसावी ,प्रियंका राजोळे, तेजस्विनी जाधव ,प्रतीक्षा शिंदे ,संगीता भारस्कर ,सविता घुले श्रीमती झांबरे सुवर्णा हिरे ,राहुल कारे , अमोल कांडेकर , कांगणे भाऊसाहेब ,श्री टरले भाऊसाहेब उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अवधूत आवारे यांनी केले तर आभार अशोक टरले यांनी मानले.
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भावात महाले : मो. ८२०८१८०५१०