β : नाशिकरोड :⇔बिटको महाविद्यालयात ‘ संविधानाचे महत्त्व आणि आजचा समाज ‘ या विषयावर पथनाट्य सादर – (प्रतिनिधी : संजय परमसागर )
β : नाशिकरोड :⇔बिटको महाविद्यालयात ' संविधानाचे महत्त्व आणि आजचा समाज ' या विषयावर पथनाट्य सादर - (प्रतिनिधी : संजय परमसागर )
बिटको महाविद्यालयात ‘ संविधानाचे महत्त्व आणि आजचा समाज ‘ या विषयावर पथनाट्य सादर
β⇔ दिव्य भारत बीएस म न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.4 डिसेंबर 2023
β⇔नाशिकरोड, ता.4(प्रतिनिधी : संजय परमसागर )–गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत ‘ जिमखाना हॉल ‘ येथे विधी महाविद्यालय नाशिक येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘ संविधानाचे महत्त्व आणि आजचा समाज ‘ या विषयावर पथनाट्य सादर केले . यात भारतीय संविधानाचे वर्तमान काळातील महत्व विविध प्रसंग आणि पात्रातून विषद करण्यात आले. शासन म्हणजे लोकशाही अशी साधी सोपी लोकशाहीची व्याख्या असली तरीसुद्धा लोकशाही ज्या चार स्तंभांवर उभी आहे , ते मजबूत करणे गरजेचे असून संविधान चालवणारे हात सुद्धा तितकेच मजबूत असायला हवे. भारतीय नागरिकांमध्ये संविधानात्मक नैतिकता असायला हवी. असे याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मुद्दे उपस्थित करून प्रसंग सादर केले .
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.डॉ. मंजुषा कुलकर्णी यांसह कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे , वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य व एन सी सी,एअर विंग कमांडर डॉ. आकाश ठाकुर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार , महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.कांचन नवले , एनसीसी आर्मी विंग लेफ्टनंट डॉ.विजय सुकटे, विज्ञान शाखेचे समन्वयक डॉ.के.सी.टकले , कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य सौ. सुनिता नेमाडे , पर्यवेक्षिका सौ. प्रणाली पाथरे , प्रा . सुरेखा कानडे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच कमवा आणि शिका योजना विभागाचे विद्यार्थी यांसह कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
β⇔ दिव्य भारत बीएस म न्यूज: मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०