Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नागपूर :⇔संपूर्ण गडकिल्ले भारताचे शिव वैभव : केंद्र व राज्य सरकारने जोपासावे-(प्रतिनिधी: रमेश लांजेवार)

β : नागपूर :⇔संपूर्ण गडकिल्ले भारताचे शिव वैभव : केंद्र व राज्य सरकारने जोपासावे-(प्रतिनिधी: रमेश लांजेवार)

018491

संपूर्ण गडकिल्ले भारताचे शिव वैभव : केंद्र व राज्य सरकारने जोपासावे

β : नागपूर :⇔संपूर्ण गडकिल्ले भारताचे शिव वैभव : केंद्र व राज्य सरकारने जोपासावे-(प्रतिनिधी: रमेश लांजेवार)
β : नागपूर :⇔संपूर्ण गडकिल्ले भारताचे शिव वैभव : केंद्र व राज्य सरकारने जोपासावे-(प्रतिनिधी: रमेश लांजेवार)
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार  : दि.18 फेब्रुवारी  2025
β⇔ नागपूर,दि.18 (प्रतिनिधी: रमेश लांजेवार ):- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा एक महाराष्ट्राचा उत्सवाचा सन असुन देशासाठी गौरवाचा आणि महत्वपूर्ण दिवस आहे. त्याचप्रमाणे जगासाठी गनीमीकव्याची शिकवन असुन जगात आपण जो गोरीला वॉर म्हणतो त्याची उत्पत्ती गनीमीकव्यातुनच झाली आहे.म्हणुनच जगात शिवाजी महाराजांच्या इतिहासाला आगळेवेगळे महत्त्व आहे. १९ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.सन १८६९ साली महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी फुलेंनी सन १८७० साली शिवजयंतीची सुरूवात केली.ती पहीली शिवजयंती होती.त्यानंतर शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र करण्याचे काम लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केले. २० व्या शतकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली व दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटात शिवजयंतीला सुरूवात झाली.
महाराष्ट्र सरकारने २००१ पासून शके १५५१ (शुक्रवार १९फेब्रुवारी १६३०) ही शिवजयंतीची तारीख स्वीकारली त्यानुसार महाराष्ट्र सरकारने १९ फेब्रुवारी सार्वजनिक सुट्टी जाहिर केली.इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही जन्म तारीख मानली जाते. त्यानुसार महाराष्ट्राबाहेर अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस मानतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या दिनदर्शिकामध्ये शिवजयंतीची वेगवेगळी तारीख दाखवीली आहे. महाराष्ट्रात शिवजयंतीच्या तारखेला महत्व नसुन त्यांचे कर्तुत्व,त्यांचा त्याग,रयतेची जबाबदारी आणि लाखोंनी सैन्य घेऊन चढाई करणाऱ्या मोगल साम्राज्याचा अंत करणे हे महत्वाचे आहे.मी तर म्हणेल की शिवजयंती रोज साजरी व्हावी आणि शिवाजी महाराजांचे गोडवे जनतेपर्यंत पोहचवावे. तेव्हाच भारतात एकच नाही तर  लाख शिवा तयार होतील. कारण शिवाजी महाराजांच्या पुण्यांयीनेच आज आपण ताठ मानाने आणि स्वाभिमानाने जगत आहो. गनीमीकाव्याने मोगलायीचा व मोगल साम्राज्याचा अंत केला व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. याचा गर्व महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला आहे. आज भारताची गौरव गाथा जी आपण ऐकतो त्याचे संपूर्ण श्रेय शिवरायांनाच आहे.
                     शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताची अबाध्य शक्ती आहे.  शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचले पाहिजे.जानता राजा, रयतेचा राजा,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून जगभर ख्याती प्राप्त आहे.त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने आणि स्वाभिमानाने घेतले जाते.तत्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. १९ फेब्रुवारी रोजी सुमारे १११ पेक्षा अधिक देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते.असे सांगण्यात येते की शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे सुध्दा होते. कोणत्या घोड्यांचा वापर केव्हा करायचा हे त्यांना चांगलेच अवगत होते.शिवाजी महाराजांकडे मोती, विश्र्वास,तुरंगी, इंद्रायणी,गाजर,रणभीर,कृष्णा असे ७ घोडे होते.शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतांना सुमारे ४०० गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वत: बांधले तर काही किल्ले लढाया करून जिंकले. महाराजांचा एक गडकिल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतिकच होते. त्यामुळे मी केंद्र व राज्य सरकारला आग्रहाची विनंती करतो करतो की महाराष्ट्रातील संपूर्ण गडकिल्ल्यांची देखरेख करून सुसज्जीत केले पाहिजे. यातच शिवरायांना खरा मानाचा मुजरा ठरेल. कारण महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील गडकिल्ले ही भारताचे वैभव,धरोहर  व शान आहे. कारण गडकिल्ल्यामुळेच  शिवरायांच्या आठवणी पुन्हापुन्हा जागृत होतील.गडकिल्यांची सुरक्षा म्हणजे शिवजयंतीच्या निमित्ताने महाराजांना खरे अभिवादन व मानवंदना ठरेल. कारण शिवरायांनी मुठभर मावळ्यांच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व संपूर्ण किल्ले काबीज केले हा अभिमान महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला आहे.त्यामुळे इतिहास जागृत ठेवण्यासाठी संपूर्ण किल्ले पर्यटनाच्या दृष्टीने व शिवरायांची आठवण या उद्देशाने किल्ल्यांचे जतन करणे गरजेचे आहे. कारण शिवाजी महाराज रयतेचे राजा होतेच.त्याचप्रमाणे त्यांच्यात दैवी शक्ती सुध्दा होती.
३९५ वर्षांनंतर आजही कुठल्याही गडकिल्ल्यांवर गेले तर ४ हजार फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्ल्यावर स्वच्छ पाणी प्यायला मिळते.हा संपूर्ण शिवरायांचाच प्रताप आहे.असे सांगण्यात येते की वयाच्या १७ व्या वर्षी शिवरायांनी स्वत: डिझाईन करून रायगड किल्ला बांधल्याचे सांगण्यात येते.आई जगदंबेच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण काम फत्ते केले व मावळ्यांमध्ये उर्जा निर्माण करून मोगलांना भुईसपाट केले.अबझल खानासारख्या महाकाय शक्तीशाली सरदाराला गनीमीकाव्याने यमलोक पोहचवीले. अशाप्रकारे मोगलांच्या संपूर्ण सरदारांना एक-एक करून धाराशाही करण्याचे काम शिवरायांनी व त्यांच्या सरदारांनी आणि मावळ्यांनी केले. हा देश साधुसंतांचा,थोरमहात्म्यांचा, क्रांतीकारकांचा व हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवरायांचा देश आहे.याची जोपासना महाराष्ट्र व केंद्र सरकारने करावी अशी मी आग्रहाची विनंती करतो.महाराष्ट्रातील १२ गडकिल्ले युनेस्कोकडे नामांकनासाठी पाठविले आहे ही महाराष्ट्रासाठी व भारतासाठी आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे.यामुळे जागतिक वारसा यादीत भारताचे नाव समाविष्ट होऊन पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल.देशात वाढते अत्याचार रोखण्यासाठी, महागाई,शेतकरी व कामगारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शिवरायांच्या तत्त्वांच्या अनुकरणाचा वापर करून केंद्र व राज्य सरकारने रयतेच्या सुरक्षेची व सुख-समृध्दीची जबाबदारी स्वीकारावी. यातच खरे शिवजयंतीचे महत्त्व दिसून येईल.त्याचप्रमाणे शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने  मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करायला हवे.यामुळे संपूर्ण गडकिल्ले सुशोभित होईल व जिकडे-तिकडे आपल्याला हिरवा गालीचा दिसून येईल. त्याचप्रमाणे शिवजयंतीच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीने जर वृक्ष लागवड केली तर प्रत्येक झाडाच्या पानात, फुलात, फळात आपल्याला शिवाजी महाराजांचे दर्शन अवश्य होईल व त्यांच्या आठवणी अनंत काळापर्यंत टीकुण राहील.त्यामुळे शिवजयंतीचे औचित्य साधून सरकार, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना,शिव भक्त व देशातील नागरिक यांनी प्रत्येकांनी एक तरी  झाड लावले पाहिजे. यामुळे वाढत्या प्रदूषणावर मात करण्यास मोठी मदत होईलच. त्याच प्रमाणे गुरांना चारा व संपूर्ण जीवसृष्टीला ऑक्सिजन मिळण्यास मोठी मदत होईल.त्यामुळे एकाच दिवशी लाखो झाडे लावल्या जातील ही झाडे अनेक युगांपर्यंत सर्वांच्याच स्मरणात राहिल.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा.

हर हर महादेव
🚩जय भवानी!जय शिवाजी!🚩

लेखक :
                 रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर. 

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510 

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

 
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!