





सुरगाणा तालुक्यात निष्कृष्ट दर्जाची कामे ठेकेदारांकडून लाखो रूपयांचा चुराडा– माजी आमदार जे.पी.गावित

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 1 जानेवारी 2024
β⇔सुरगाणा, ता.1 ( प्रतिनिधी : पांडुरंग बिरार ):-लाडगाव (बुबळी)फाटा तालुका सुरगाणा येथे प्रलंबीत मागण्यासाठी डि.वाय. एफ. आए.चे रास्तारोको दोन दिवशीय आंदोलन संपन्न झाले . यावेळी माजी आमदार जे.पी गावित यांनी आंदोलन स्थळी भेट देवून कार्यकर्त्यासमोर मार्गदर्शन केले, ते म्हणाले, की ठेकेदारांनी सुरगाणा – बर्डीपाडा रस्ता , सुरगाणा -आहवा रस्ता , सुरगाणा – माणी रस्ता , सुरगाणा – श्रीभुवन रस्ता , सुरगाणा – रोकडपाडा रस्ता , सुरगाणा – बाऱ्हे रस्ता हे अतिशय खराब झालेले असून निष्कृष्ट बनवलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी ,प्रवाशी ,नागरिक, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर रस्ते, शासकीय ईमारती, पुल, मोऱ्या,पाझर तलाव,धरण ,सिमेंट बंधारे ,जलजीवन पाईपलाईन आदि विकास कामे लोकप्रतिनिधी , अधिकारी व ठेकेदार यांच्या दुर्लक्षपणामुळे रखडलेली आहेत . सदर कामे त्वरित पूर्ण करण्यात यावीत असे, त्यांनी उपस्थित अधिकार्यांना सांगितले. पुढे म्हणाले तालुक्यात विकास कामांच्या नावाने मोठ्या प्रमाणात घोटाळे सुरु आहेत ,कामाचे उदघाटन करून दोन- तीन वर्ष झाली, परंतु अद्याप कामे झालेले नाहीत,असे माजी आमदार गावित यांनी सांगितले.
सुरगाणा तालुक्यातील रखडलेली विकासकामे सुरु करून त्वरित मार्गी लावावी , यासाठी लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने लाडगाव (बुबळी )फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले .
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : मुख्य संपादक :डॉ . भागवत महाले : मो.८२०८१८०५१०