श्री एकवीरा देवी माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा संपन्न

(β धुळे प्रतिनिधी :भागवत सोनवणे)
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि, 25 एप्रिल 2024
β⇔ धुळे, दि.25 (प्रतिनिधी :भागवत सोनवणे):-श्री एकवीरा देवी माध्यमिक विद्यालय धुळे येथे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत वाघ व सचिव प्रदीप वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा संपन्न झाला. सन 1998 -99 दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी 25 वर्षानंतर आयोजित केला होता. माजी विद्यार्थ्यांनी साध्य केलेले यश डॉक्टर,शिक्षक,व्यावसायिक व आयटी क्षेत्र पाहून शिक्षकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. माझी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेविषयी आठवणीतील विचार मांडून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या बालपणीच्या सुखद क्षणांना उजाळा दिला.स्नेह मेळाव्याच्या प्रमुख अतिथी संस्थेच्या संचालिका सौ जयश्रीताई वाघ यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापिका सौ पी आर अहिरराव यांनी शालेय जीवनातील क्षण हे मोत्याप्रमाणे असतात त्यांना आयुष्यभर अलगदपणे जपून ठेवताना शाळेची सातत्याने जोडून राहा,भेटा, बोला व शाळा ही सदैव तुमचीच आहे, असे विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा व प्रेम दर्शवणारे भाव व्यक्त केले. माझी मुख्याध्यापिका श्रीमती मोरे एम एल ,श्रीमती ए एन देशमुख ,श्रीमती भदाने ए ए , श्रीमती ए.वाय शिंपी , ए.बी गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अनेक वर्षांनी झालेल्या गाठीभेटीने माजी विद्यार्थी एकत्र आले होते. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.जुन्या आठवणींच्या चर्चा गप्पा,खोड्या, किस्से, व हास्य कल्लोळाने हा मेळावा उत्तरोत्तर रंगला होता.
स्नेहा मेळाव्याचे प्रास्तविक डॉ स्वाती बागुल हिने केले , डॉ.किरणकुमार ठाकरे व डॉ. भूषण चौधरी यांनी मेळाव्याच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळली. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा म्हणून सर्व शिक्षकांचा स्मृती चिन्ह, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन गौरव केला. माझे विद्यार्थी, माझे शिक्षक अशा बोधवाक्याने सर्वांची मने जिंकली. स्नेह मेळाव्याच्या सांगता नंतर विद्यार्थ्यां मार्फत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व शिक्षक व माजी विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. जड पावलांनी स्नेहपूर्वक निरोप घेत कार्यक्रम कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी डॉ.किरणकुमार ठाकरे,डॉ. भूषण चौधरी. डॉ. भूषण नेरकर. डॉ.उदय मेघावत,डॉ. नागेश चित्ते.डॉ.रितेश सोनवणे, भाग्योदय सूर्यवंशी, प्रा. दीपक दाभाडे.मुकेश बेहरे,योगेश चौधरी, योगेश भामरे, योगेश सोनार.डॉ.निशा हिरे(वारुडे ),सौ.वैशाली भदाणे, सौ.मनीषा मोरे(लंबोडे),सौ.दिप्ती पाटील,सौ.मोनाली काटे.सौ. प्राची माने (घाडगे)डॉ.स्वाती बागुल या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )