β : वणी ⇔वणी आदर्श प्राथमिक शाळेत स्वर्गीय श्री. दिनकरराव थोरात यांची जयंती साजरी…( प्रतिनिधी : सुरेश सुराशे )
β : वणी ⇔वणी आदर्श प्राथमिक शाळेत स्वर्गीय श्री. दिनकरराव थोरात यांची जयंती साजरी...( प्रतिनिधी : सुरेश सुराशे )
वणी आदर्श प्राथमिक शाळेत स्वर्गीय श्री. दिनकरराव थोरात यांची जयंती साजरी…
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि 10 ऑक्टोबर 2024
β⇔ वणी : ता.10 ( प्रतिनिधी : सुरेश सुराशे ):- वणी गावचे सतरा वर्षे सरपंच पद भूषविणारे विकासपुरुष, स्वर्गीय कै. दिनकरराव थोरात यांची जयंती आज मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आदर्श प्राथमिक शाळा, वणी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भास्कर भगरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी विधानसभेचे माजी आमदार रामदास चारोस्कर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत कड, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री. पोपटराव थोरात, डॉ. योगेश गोसावी, सुनील थोरात, अनिल थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री. मनोज थोरात, रवीकुमार सोनवणे, बंटी सय्यद, तसेच शाळेचे मुख्याध्यापक बदलते सर व इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. दिनकरराव थोरात यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे गावात झालेला विकास आणि त्यांच्या कार्यशैलीने वणीकरांच्या मनात त्यांनी निर्माण केलेले अजरामर स्थान यावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी विशेषतः स्व. दिनकरराव यांच्या निर्भीड नेतृत्वाची प्रशंसा केली.
या कार्यक्रमात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आणि वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षीरसागर सर यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )