





”मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने”मुळे शिरपूर तहसील कार्यालयात महिलांची मोठी गर्दी; शैक्षणिक कागदपत्र वेळेत मिळण्याची विद्यार्थ्यांची मागणी

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि. 19 जून 2024
β⇔शिरपूर, दि.19 (प्रतिनिधी : ज्ञानेश्वर सैंदाणे):- महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘लाडकी बहिण योजना’च्या पहिल्या जीआरमध्ये पात्रतेसाठी डोमसाईल आणि उत्पन्न दाखला आवश्यक असल्याचे सांगितले होते. या प्रक्रियेमुळे शिरपूर तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्रांमध्ये दाखले काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली. अनेकांनी लवकर दाखले मिळतील अशी आशा दाखवून डबल पैसे घेतले, परंतु वीस ते पंचवीस दिवसांनीही कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे कोणालाही डोमसाईल किंवा उत्पन्न दाखले मिळाले नाहीत.
शासनाने आता उत्पन्न दाखला आणि डोमसाईल व्यतिरिक्त इतर कागदपत्रे देखील चालणार असल्याचे सांगितले आहे, ज्यामुळे गर्दी काहीशी कमी झाली आहे. तथापि, शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेले राष्ट्रीयता, डोमसाईल आणि उत्पन्न दाखले मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेतही दाखल्यांची आवश्यकता असते, विशेषत: जात प्रमाणपत्र आवश्यक असते. यासाठी प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन शैक्षणिक कामांसाठी विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये, म्हणून लवकर दाखले देण्याची मागणी करण्यात येत आहे. सेतू विभागाकडून सांगितले जात आहे की, तीस हजार पेंडिंग दाखले आहेत. तहसील विभागाने याची जबाबदारी घेत तात्काळ दाखल्यांसाठी अडचणी सोडवाव्यात, अशी शिरपूर तालुक्यातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून विनंती केली जात आहे.
विद्यार्थ्यांची व्यथा : “माझ्या शैक्षणिक कामासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि उत्पन्न दाखला अर्जंट लागतो आहे. मी २०-२५ दिवसांपूर्वी कागदपत्रांची पूर्तता केली आहे, परंतु अद्याप मला दाखले मिळालेले नाहीत.”-अक्षय खोंडे, ( त-हाडी ,शिरपूर )
शैक्षणिक नुकसान टाळावे :“शासनाने ‘लाडकी बहिण योजना’ लागू केली असली, तरी त्यातील अडचणी सोडवण्याची गरज आहे. शैक्षणिक कामांसाठी आवश्यक दाखले तात्काळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात अडचणी येऊ नयेत. प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करावी.”: ज्ञानेश्वर सैंदाणे- नागरिक ,शिरपूर
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)