





बिटको महाविद्यालयातील एनसीसी आर्मी विंग तर्फे गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलन
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि २९ सप्टेंबर २०२३
β⇒नाशिकरोड , ता . २८ ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील एनसीसी आर्मी विंग तर्फे दसक घाटावर गणेश मूर्ती आणि निर्माल्य यांचे संकलन करण्यात आले .
सर्व कॅडेट्सनी एकूण ७५६ मूर्तींचे संकलन करून सर्व मूर्ती महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आल्या . या मोहिमेसाठी लेफ्टनंट डॉ. विजय सुकटे , एसयुओ- अमित दिघोळे , जेयुओ – प्रिया गायकवाड आणि ५७ कॅडेट्स यांनी परिश्रम घेतले . या मोहिमेसाठी सर्व कॅडेट्सचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी कौतुक करून आभार मानले.
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
