सा.फुले पुणे विद्यापीठात गोखले फार्मसी महाविद्यालयाची नियतकालिक स्पर्धेत प्रथम पारितोषिक ! ‘ व्यावसायिक विभागातून सतत पाचव्यांदा पारितोषिक ’
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि ०८ ऑक्टोबर २०२३
β⇒ नाशिक (कॉलेजरोड), ता. ८ (प्रतिनिधी : छाया लोखंडे – गिरी ) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या नियतकालिकांच्या स्पर्धेत नाशिक गोखले एजुकेशन सोसायटी संचलित सर डॉ. मो.स.गोसावी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाने व्यावसायिक विभागातून नाशिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. पुणे विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांची ही नियतकालिक स्पर्धा व्यावसायिक अव्यावसायिक अशा दोन स्वतंत्र विभागात घेण्यात येते. पुणे विद्यापीठातर्फे विशेष समारंभात महाविद्यालयाच्या ‘स्पेक्ट्रम’ या नियतकालिकास पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
आपण प्रत्येक वर्षांचा ‘स्पेक्ट्रम’ हे मॅगझीन पहिले तर आपल्याला सिंहावलोकन करण्याची संधी तर मिळेलच पण त्याच बरोबर हा अंक महाविद्यालयाच्या प्रगतीचा व चढत्या आलेखाची साक्ष देतो. सदर अंक महाविद्यालयातील होणाऱ्या विविध उपक्रमांचे , कार्यक्रमांचे , प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कार्याचे व विविध क्षेत्रातील यशाचे दर्शन घडवित आहे. आजपर्यंत ‘स्पेक्ट्रम’ नियतकालिकास पुणे विद्यापीठाकडून पाचव्यांदा गौरवण्यात आलेले आहे.त्यात केवळ साहित्यच नाही तर वर्षभरात झालेल्या कार्यक्रमांची क्षणचित्रेही आहेत.शैक्षणिक वर्षात असलेल्या विविध समित्यांचे अहवाल ,विविध विभागांचे अहवाल, गुणवत्ता यादी,पुरस्कारांची यादी, शिक्षकांचे कार्यकर्तृत्व , NSS , जिमखाना ,वार्षिक स्नेहसंमेलन त्यामध्ये उत्सुफुर्ततेने सहभागी होणारे विद्यार्थी , त्यांनी संपादन केलेले यश याची दखल त्यात घेतली जाते. त्यात अनेक घडामोडींचा आलेख त्यात मांडलेला असून मराठी , हिंदी , इंग्लिश या तिन्ही भाषांच्या साहित्याचा आस्वाद त्यात समाविष्ट केलेला आहे.
महाविद्यालयीन ‘स्पेक्ट्रम’ उत्कृष्ट व्हावा ,देखणा व्हावा त्यात कुठलीही त्रुटी राहू नये, म्हणून संपादक मंडळाकडून साधारणतः ६-७ महिन्यांपासून प्रकाशनाची तयारी सुरु होते. सुरवातीला सर्व विद्यार्थी , शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी आपल्या स्वेच्छेने विविध लेख संपादक मंडळाकडे पाठवतात,त्यानंतर आलेल्या लेखांतून विशेष छाननी करून त्यात निवड झालेल्या लेखांतील लेखन-त्रुटी दूर करून तसेच सर्व शहानिशा करून मगच सर्व माहिती प्रेस कडे पाठवली जाते.प्रकाशनाच्या प्रत्येक टप्प्यात बारकाईने गुणवत्ता व सुबकता बघितली जाते. गोखले एजुकेशन सोसायटीच्या नवनिर्वाचित सचिव तथा मानव संसाधन संचालिका डॉ.सौ.दीप्ती
देशपांडे, प्रकल्प संचालक श्री .पी .एम. देशपांडे,आस्थापना संचालक श्री .शैलेश गोसावी ,प्राचार्य व मुख्य स्पेक्ट्रम संपादक डॉ.एस .व्ही .अमृतकार, उपप्राचार्य डॉ.प्रशांत पिंगळे, स्पेक्ट्रम समन्वयक सौ. अनुपमा परांजपे आणि इतर सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सदर प्रकाशनास मोलाचे मार्गदर्शन लाभले.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०