





अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट 2024) शनिवारी ३१ ला संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 01 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक, दि.01 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- पुणे विद्यापीठाची बहुप्रतीक्षित पेट परीक्षा शनिवारी होणार होती, मात्र महाराष्ट्र बंद असल्याकारणाने ही परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएचडी परीक्षा (पेट 2024) शनिवार घेण्यात आली. परंतु सर्वर डाऊन असल्यामुळे नाशिक मधील केटीएचएम, आयएमआरटी आणि डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर या तीन केंद्रांनाही या सर्वर डाऊन चा फटका बसल्यामुळे सकाळी पहिल्याच सत्रात सुमारे वीस मिनिटे परीक्षेला विलंब झाला. दिवसभरात चार-सत्र मिळून एकूण सुमारे 2000 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये सोळाशेहुन अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. नाशिकच्या तिन्ही केंद्रावर सरासरी ८० टक्के उपस्थिती असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या परीक्षेला पात्रतेसाठी 100 गुण होते, त्यामध्ये संशोधन पद्धती म्हणजे ( रिसर्च मेथोडोलॉजी ) या विषयासाठी 25 प्रश्न असून प्रत्येकी दोन गुण म्हणजे 50 गुणांसाठी तर विषयावर आधारलेले 25 प्रश्न हे पण 50 गुणांसाठी होते. मुलाखत प्रक्रिया पुढील टप्प्यात होणार असून परीक्षेला 70% च्या आत मुलाखतीला 30 टक्के मूल्यांकन दिले जाणार आहे. ५ सप्टेंबरला परीक्षेच्या निकालाची संभाव्य तारीख असून आठवड्याभराच्या विलंबनाने परीक्षा झाल्याने आता निर्धारित तारखेला निकाल जाहीर होणार आहे. त्यातही निकालाला विलंब होतो की काय याकडे परीक्षार्थीचे लक्ष लागून आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )