





श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित एस.एन.पी.टी.इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून ‘खूप चांगले’ मानांकन
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 27 मे 2024
β⇔नाशिक, दि. 27 (प्रतिनिधी : चेतना कापडणे ):- महाराष्ट्र – श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटीच्या एस. एन. पी. टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई विभागाकडून पहिल्यांदाच ‘खूप चांगले (Very Good)’ मानांकन प्राप्त झाले आहे. 85 वर्षांपासून नाशिकमध्ये स्थायिक असलेली ही गुजराथी शैक्षणिक संस्था आहे. 2020-21 साली संस्थेने व्यावसायिक औषधनिर्माणशास्र अभ्यासक्रम सुरु केला. अल्पावधीतच शैक्षणिक गुणवत्ता, अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज ग्रंथालय, स्वतंत्र डिजिटल ग्रंथालय, उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि पायाभूत सुखसुविधांमुळे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या निरीक्षकांनी संस्थेचे शैक्षणिक दर्जा पाहून ‘खूप चांगले’ मानांकन दिले.
संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रभाई ठक्कर, सचीव देवेंद्र पटेल, औषधनिर्माणशास्र विभागाचे सचीव उपेंद्रभाई दिनानी, प्राचार्य डॉ. विशाल एस. गुलेचा, विभाग प्रमुख सौ. सुनीता महाले आणि इतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे ही प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.