Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

स्वर्णिमा हॉलमध्ये ‘ याद आ रहा है तेरा प्यार ‘ या सदाबहार मैफिलीत गायकांनी सादर केली विविध हिंदी गीते… रसिकश्रोते मंत्रमुग्ध …

स्वर्णिमा हॉलमध्ये ' याद आ रहा है तेरा प्यार ' या सदाबहार मैफिलीत गायकांनी सादर केली विविध हिंदी गीते... रसिकश्रोते मंत्रमुग्ध ...

018491

स्वर्णिमा हॉलमध्ये ‘ याद आ रहा है तेरा प्यार ‘ या सदाबहार मैफिलीत गायकांनी सादर केली विविध हिंदी गीते… रसिकश्रोते मंत्रमुग्ध …

दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज प्रतिनिधी नाशिक रोड संजय परमसागर 

नाशिक रोड ता .९  ( दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज ) : तौबा ये मतवाली चाल , चांदी जैसा रंग है तेरा -गजल , याद किया दिलने कहा हो तुम , हम तो तेरे आंशिक है , तुमसे मिलके ऐसा लगा, ओ मेरे शाहेखुबा , ए री पवन , याद आ रही है , ये दिल तुम बिन कही लगता नहीं , क्या खूब लगती हो , कसमे वादे प्यार , गुंजे लगे हैं केहेने , तू मुझे जानसे भी प्यारा है , मेरे ढोलना व मुख्य गाणे याद आ रहा है तेरा प्यार ,” अशी एकाहून एक सरस हृदयस्पर्शी गाणी रम्य सायंकाळी गायकांनी सादर करून रसिकांची वाहवा मिळवली .
निमित्त होते ते ‘ आशा मेलोडी मेकर्स ‘ नाशिकरोड येथील अमरकुमार प्रस्तुत ‘ याद आ रहा है तेरा प्यार ‘ या हिंदी कराओके ट्रॅक गाण्यांवर आधारित सदाबहार मैफिलीचे रविवार दि. ९ जुन २०२३ रोजी ‘ स्वर्णिमा हॉल , इंदिरानगर , नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते . या गाण्यांच्या कार्यक्रमाचे संयोजन अमरकुमार यांनी केले . स्वतः गायक अमरकुमार यासह संजय परमसागर , नेहा आहेर , सुनिल गांगुर्डे , गॉडविन लुईस यांनी विविध गाजलेली हिंदी गाणी सादर केली . कार्यक्रमास नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा श्रीमती पुजा पवार , श्री फारूख शेख , जिल्हा रुग्णालय पतसंस्था सचिव सुनील गिते , दादा गायकवाड , विरुसिंग परदेशी , कामगार नेते अजिज शेख साहेब , दिलीप बोदरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . ध्वनी व्यवस्था कैलास काळे यांनी तर सूत्रसंचालन ॲड. शशिकला राव यांनी केले . गायकांनी गायलेल्या गाण्यांना उपस्थित सर्व अतिथी व हॉलमध्ये खचाखच भरलेल्या रसिक श्रोत्यांनी उस्फूर्त दाद देऊन मैफिलीचा आनंद घेतला .

दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : मुख्य संपादक – डॉ. भागवत महाले, संपर्क  मोब . ८२०८१८०५१०  

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!