β : नाशिक :⇔ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर-(प्रतिनिधी : भागवत महाले)
β : नाशिक :⇔ विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर-(प्रतिनिधी : भागवत महाले)
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार जाहीर
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 02 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक, दि.02 (प्रतिनिधी : भागवत महाले ):- राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे आमदारांना दिला जाणारा उत्कृष्ट भाषण पुरस्कार यंदा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना जाहीर झाला आहे. उद्या दिनांक 3 दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबई विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यात राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे विधान मंडळाच्या सदस्यांना सन 2018-19 2019 20 सन 2020 21 सन 2021 22 सन 2022 23 आणि सन 2023 24 या कालावधीसाठी दिले जाणारे “उत्कृष्ट संसद पटू” व ”उत्कृष्ट भाषण पुरस्कार” यावेळी प्रदान करण्यात येणार आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची 2018- 19 या कालावधीमधील ‘उत्कृष्ट भाषण पुरस्कार’ साठी निवड झाली आहे. त्यांचा सर्व तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )