बिटको महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरावडाचे उद्घाटन संपन्न

आपल्यातील स्पर्धापरीक्षा विषयी भीती , सकारात्मकतेने अभ्यास व कौशल्य प्राप्त करून यश प्राप्ती – प्रा. मनीष देवरे
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 24 जानेवारी 2024
β⇔नाशिकरोड, दि.24( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :-” परीक्षेला दिसणारी गर्दी पाहून नकारात्मकता आपल्यामध्ये येऊ नये. अभ्यासक्रम माहीत करून परीक्षा पद्धती याची योग्य माहिती घेऊन यशापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. केवळ पुस्तकी शिक्षण न घेता आवश्यक संवाद कौशल्य आपण स्पर्धा परीक्षांना समोर जाऊन यश संपादन करून व ध्येय गाठू शकतो. त्यासाठी आपल्यातील भीती अधिक घालवा, सकारात्मकतेने वाटचाल करा,” असे दाताईश्वर फाउंडेशनचे संचालक प्रा. मनीष देवरे यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात दि. २३ जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीत मराठी विभागातर्फे सेमिनार हॉलमध्ये ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘चे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी पहिल्या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा- प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यासह प्रमुख वक्ते प्रा.मनीष देवरे, सौ मनीषा देवरे, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. के. एम. लोखंडे, डॉ.उत्तम करमाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितले की,’ आपली संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे, मराठी भाषेची प्रकल्भता ज्ञान, मराठी साहित्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. अस्मिता जागृत करा,मराठी साहित्य वाचनाची रुची वाढवून ज्ञानाचे विपुल धन प्राप्त करा,’असे सांगितले. तसेच याप्रसंगी सौ. मनीषा देवरे यांनीही यूपीएससी, एमपीएससी, नेट- सेट, बँकिंग रेल्वे भरती,पीएचडी व नोकरी विषयक मार्गदर्शन आदीं बाबत माहिती देऊन वस्तुनिष्ठ लघुत्तरी दीर्घोत्तरी प्रश्न याबद्दल सविस्तर माहिती दिली.
या पंधरवड्यात विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक श्री. मुकुंद कुलकर्णी हे ‘ नाटक आणि जीवनानुभव ‘, पीएसआय संदीप बोराडे हे ‘सायबर क्राईम’, या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी स्वाक्षरी स्पर्धा घेण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ. के. एम. लोखंडे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. उत्तम करमाळकर तर परिचय डॉ. आरती गायकवाड यांनी केला. तर आभार प्रा.डॉ.शरद नागरे यांनी मानले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०८१०