β : सुरगाणा :⇒ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगरांना आदिवासी योजनांचा लाभ देऊ या घोषणे विराेधात बोरगावला रास्ताराेकाे -( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे )
β : सुरगाणा :⇒ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगरांना आदिवासी योजनांचा लाभ देऊ या घोषणे विराेधात बोरगावला रास्ताराेकाे -( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगरांना आदिवासी योजनांचा लाभ देऊ या घोषणे विराेधात बोरगावला रास्ताराेकाे
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्त्तसेवा : नाशिक : रविवार : दि. १ ऑक्टोबर २०२३
β⇒ सुरगाणा, ता. १ ( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे ) :- सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणाचा लाभ देऊ नये, यासाठी आदिवासी टायगर ग्रुप, अखिल भारतीय विकास परिषद आणि आसरा फाउंडेशनतर्फे रविवारी (दि. १) सकाळी ११ वाजता एक तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी सुरगाणा तहसीलदार प्रशांत कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
आदिवासी समाजाला संविधानाने साडेसात टक्के आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाचा लाभ घेऊन आदिवासी समाजाला विविध योजना व शासकीय नोकरीचा लाभ मिळत आहे. धनगर समाजाला आदिवासी आरक्षण मिळेपर्यंत आदिवासी योजनांचा लाभ देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ सप्टेंबरला केली. याचा विरोध म्हणून आदिवासी संघटनांनी बोरगावच्या बिरसा मुंडा चौकात रास्तारोको केला. यावेळी रास्ता राेकाे आंदोलनात मोहन गांगुर्डे, सखाराम भोये, अशोक गवळी, भास्कर भोये, संदीप भोये, मुरलीधर ठाकरे, चंद्रकांत भरसट, सचिन राऊत, पंकज चव्हाण, हेमंत खंबाईत, जीवन मोहन, नवनाथ पवार, दिनेश गांगुर्डे, चंद्रकांत गावित, हरेष पवार, किरण पवार, प्रकाश पवार, मनोज चौधरी, मनोहर पवार, मुरलीधर राऊत, हेमंत चव्हाण, चिंतामण भोये, सुंदर जोपळे, जानु गांगुर्डे, काशीनाथ भोये, शांताराम गांगोडे, किरण बागुल, दीपक बोरसे, दीपक गांगुर्डे, शांताराम गवळी, पुंडलिक धुळे, सतिश गाढवे, आनंद पडवळ, दीपक गांगुर्डे, कल्पना भरसट, चंद्रकला गावित, शोभा जोपळे तसेच सुरगाणा तालुक्यातील आदिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०